बालिकेचा विनयभंग, आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:27 IST2020-12-04T04:27:28+5:302020-12-04T04:27:28+5:30

कळमेश्वर : चार वर्षीय बालिकेस घरात बाेलावून तिच्याशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केल्याची घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या ...

Girl molested, RAP arrested | बालिकेचा विनयभंग, आराेपी अटकेत

बालिकेचा विनयभंग, आराेपी अटकेत

कळमेश्वर : चार वर्षीय बालिकेस घरात बाेलावून तिच्याशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केल्याची घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडखैरी येथे नुकतीच घडली. यातील आराेपीस अटक करण्यात आली आहे.

पीयूष परिताेष राॅय (२३, रा. झाेपडपट्टी, गाेंडखैरी, ता. कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. पीडित बालिका तिच्या आजीसाेबत घरी हाेती. ती एकटीच असल्याचे पाहून पीयूषने तिला शेव व पैसे देण्याची बतावणी करीत स्वत:च्या घरी बाेलावले आणि तिच्याशी अश्लील चाळे केले, शिवाय हा प्रकार कुणालाही न सांगण्याची तंबीही दिली. तिने हा प्रकार आईला सांगितला. आईने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि ३५४, ३५४ (ब), ५०६, पाेक्साे २०१२ सहकलम ७, ८, ९ (एम) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनाली रासकार करीत आहेत.

Web Title: Girl molested, RAP arrested