तरुणीचा शेजाऱ्यावर बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:06 IST2021-06-11T04:06:33+5:302021-06-11T04:06:33+5:30

पारडीतील घटना : आरोपी गजाआड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पत्नी घरी नसताना शेजारच्या तरुणीला घरात बोलावून तिच्याशी शरीरसंबंध ...

Girl accused of raping neighbor | तरुणीचा शेजाऱ्यावर बलात्काराचा आरोप

तरुणीचा शेजाऱ्यावर बलात्काराचा आरोप

पारडीतील घटना : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पत्नी घरी नसताना शेजारच्या तरुणीला घरात बोलावून तिच्याशी शरीरसंबंध जोडणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली बुधवारी अटक केली.

तक्रार करणारी तरुणी १९ वर्षांची आहे. ती पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या शेजारीच आरोपी अमोल श्यामराव ठाकरे (वय ३१) राहतो. तो भाजीपाला विकतो. तरुणीच्या तक्रारीनुसार, पत्नी बाहेरगावी गेली की अमोल सदर तरुणीला घरात बोलावून तिच्याशी शरीरसंबंध जोडायचा. १ डिसेंबर २०२० ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. त्यानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर, सदर तरुणीने बुधवारी पारडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून अमोल ठाकरेविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. पोलीस उपनिरीक्षक शरद शिंपणे यांनी तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

---

विलंबाचे कारण गुलदस्त्यात

तरुणीने बलात्काराची तक्रार नोंदविण्यासाठी एवढा उशीर का केला, ते स्पष्ट झाले नाही. या संबंधाने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Web Title: Girl accused of raping neighbor