शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

गिरीश कर्नाडांची मिश्किली, नागपूरभेटीचे हृद्य संस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 9:13 PM

रंगभूमीसह लेखन आणि अभिनयकलेच्या क्षेत्रात उमटवलेला कर्तृत्वाचा अभेद्य ठसा, नाटकातील स्त्री व्यक्तिरेखांची पारंपरिक चौकट मोडून त्यांना दिलेला आव्हानात्मक बाज, शिकागो विद्यापीठात केलेले अध्यापन तसेच पद्मभूषण, पद्मश्री, ज्ञानपीठासह अनेक पुरस्कारांचे मानकरी... अशा समृद्ध कारकिर्दीचे धनी असलेले ज्येष्ठ नाटककार, कलावंत, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या निधनाने अवघे कला क्षेत्र शोकमग्न झाले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नव्वदीनिमित्त २४ मार्च २०१४ रोजी साहित्य संघाच्या संकुलात आयोजित नवतीच्या पर्वात गिरीश कर्नाड यांची मुलाखत अजेय गंपावार यांनी घेतली होती. यात प्रायोगिक, व्यावसायिक तसेच जागतिक रंगभूमीचा परामर्श घेताना डॉ. कर्नाड यांनी अत्यंत स्पष्ट व परखडपणे आपली मते मांडली होती. त्याचा गोषवारा देत आहेत स्वत: मुलाखत घेणारे अजय गंपावार

भारतीय आधुनिक रंगभूमीला वेगळे वळण देणाऱ्या गिरीश कर्नाडांचा आदरयुक्त दरारा सर्वांच्या मनात आहे. फक्त नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता एवढीच त्यांची प्रतिमा नाही तर तत्त्ववेत्ता, सामाजिक प्रश्नांवर सडेतोड ठाम भूमिका घेणारे चिंतनशील व्यक्ती या त्यांच्या भूमिकासुद्धा सर्वमान्य आहेत. त्यांच्या राजकीय विचारांबाबत कुणाचे मतभेद असू शकतात; पण त्यांच्या कलाकृतींबाबत मात्र कुणाच्याही मनात किंतू येऊ शकत नाही. पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी यासारख्या अनेक पुरस्कारांनी आणि ज्ञानपीठ सन्मानाने विभूषित गिरीश कर्नाड नागपूरला विदर्भ साहित्य संघात आले होते. तेव्हा त्यांचा प्रचंड साधेपणा नागपूरकरांनी अनुभवला. अहंकार, मोठेपणा अशी कोणतीही झूल न पांघरता प्रेक्षकांशी, रसिकांशी त्यांनी जो संवाद साधला तो अविस्मरणीय होता. व्यावसायिक चित्रपटांमधून केलेल्या भूमिकांमुळे सर्वसामान्यांना साहित्यातील, रंगभूमीवरील त्यांच्या उत्तुंग कामगिरीपेक्षा त्यांचे फिल्मी ग्लॅमरच अधिक माहीत आहे.गिरीश कर्नाड यांच्या पोटातील अनेक रहस्ये आता या मुलाखतीदरम्यान उलगडल्या जातील, असा उल्लेख होताच त्यांनी पोट फुटल्याचा बेमालूम अभिनय केला आणि सारे सभागृह श्रोत्यांच्या हसण्याने दणाणून गेले. एका गंभीर प्रवृत्तीच्या लेखकाची ही मिश्किली साऱ्यांनाच मनापासून आवडली. मी मराठी उत्तम बोलतो, मी तुमच्याशी मराठीतच संवाद साधणार आहे, असे म्हणत त्यांनी साऱ्या सभागृहाला जिंकून घेतले. अतिशय निर्भीड आणि स्पष्ट भाष्य करणारे त्यांचे आत्मचरित्र हेमा मालिनीसोबत होणाऱ्या पण न झालेल्या लग्नाच्या दिलखुलास किस्स्यावर संपते, याची आठवण आवर्जून व्हावी, असेच हे क्षण होते.त्यांनी दिग्दर्शित केलेल्या उत्सव या चित्रपटात शशी कपूर यांनी साकारलेला खलनायक मुळात अमिताभ बच्चन करणार होते. अपघातामुळे पुढे ही भूमिका अमिताभ साकारू शकले नाही. त्या काळातील तो एक मोठा एक्सपरीमेंट होता. दुर्दैवाने ते घडू शकले नाही, अशी एक वेगळीच आठवण यानिमित्ताने श्रोत्यांना ऐकायला मिळाली. संस्कार हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट सेन्सॉरने बॅन केला होता. पुढे याच चित्रपटाला राष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळालं होतं, असे म्हणत त्यांनी सेन्सॉरचा मला प्रचंड अनुभव आहे, हेही सांगितले होते.महेश एलकुंचवारांसोबतचे असलेले भावबंध व्यक्त करत त्यांनी नागपूरकरांना सुखावून टाकले होते. ते म्हणाले, महेश एलकुंचवारांचे वासांसी जीर्णानी याचा अनुवाद मी केला होता. एलकुंचवार यांच्या नाटकात कमी शब्दात मोठा आशय आहे. हा पॉझ मला इतरत्र सापडला नाही. त्यामुळेच मी एलकुंचवारांच्या प्रेमात आहे.कर्नाड म्हणाले होते, मला मुळात कवी व्हायचे होते. इंग्लंडला जाऊन इंग्रजी कवितांसाठी नोबेल मिळवावे अशी माझी इच्छा होती. पण मी नाटककार झालो. कन्नड भाषेमुळे मी नाटकांकडे वळलो. पहिले नाटक ययाती सहजपणे आले. पण नंतर तुघलकपासून मी बराच अभ्यास सुरू केला. नाटक हे घर बांधण्यासारखे किंवा अपत्य जन्माला घालण्यासारखे असते. नाटक हे क्रिएशन आहे. त्यात इतिहासाचे वेगवेगळे पैलू शोधण्याचा प्रयत्न असतो. सिनेमाला सेन्सॉरशिप असावी, पण ती कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातूनच. कलाकृतीला धक्का पोहोचविणारे नियंत्रण मला मान्यच नाही.प्रचंड विद्वत्ता, व्यासंग, उत्तुंग कामगिरी, तेंडुलकरांसोबतचे मतभेद, बादल सरकार, मोहन राकेश, सत्यदेव दुबे यांच्या आठवणी, नव्या पिढीतल्या कलाकारांना मनापासून दिलेली दाद यामुळे चकित झालेल्या नागपूरकर श्रोत्यांना आपल्या संमोहनात कायम ठेवत गिरीश कर्नाडांनी आज एक्झिट घेतली.

  • अजेय गंपावार
टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडinterviewमुलाखत