‘जीएचआरसीई सॅटेलाइड ग्राउण्ड’ स्टेशनचे उद्घाटन २८ जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:19+5:302021-02-05T04:55:19+5:30
नागपूर : जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय २८ जानेवारीला दुपारी ३ वाजता आपल्या सॅटेलाइट ग्राउण्ड स्टेशनचे उद्घाटन इसरो अंतरिक्ष विभागाचे ...

‘जीएचआरसीई सॅटेलाइड ग्राउण्ड’ स्टेशनचे उद्घाटन २८ जानेवारीला
नागपूर : जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय २८ जानेवारीला दुपारी ३ वाजता आपल्या सॅटेलाइट ग्राउण्ड स्टेशनचे उद्घाटन इसरो अंतरिक्ष विभागाचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून करणार आहे. भारत सर्बिया यांचा उपक्रम युनिटी सॅट माध्यमातून जीएचआरसीई आणि टीसीएस टेक्नालॉजीच्या संयुक्त विद्यमाने जीएचआरसीई सॅटचे निर्माण आणि विकास करण्यात येईल. जीएचआरसीई सॅटेलाइट ग्राउण्ड स्टेशन, सॅटेलाइट नेटवर्क ओपन ग्राउण्ड सिस्टीम योजनेचे सदस्य आहे. ते नि:शुल्क सॉफ्टवेअर व ओपन सोर्स हार्डवेअर प्लॅटफार्म सॅटेलाइट ग्राउण्ड सिस्टीमसाठी प्रचार करीत आहे. सॅट एनओजीसद्वारे तंत्रज्ञान आरबिट ग्राउण्ड स्टेशनला उपलब्ध केल्या जात आहे. रायसोनी समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी, संचालक डॉ. सचिव उंटवाले यांची उद्घाटन समारंभाला उपस्थिती राहणार आहे. सॅटेलाइट प्रोग्राम योजना संयोजक डॉ. महेंद्र गायकवाड, जीएचआरसीईचे संचालक डॉ. सचिन उंटवाले, उपसंचालक डॉ. मिलिंंद खानापूरकर यांच्या मार्गदर्शनात यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.
...............