शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपूरच्या अजब बंगल्याचे भूत उतरले; ‘ती’ वादग्रस्त निविदा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 20:39 IST

राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयीपुरता वापर करू इच्छिणाऱ्या  नागपूर मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) प्रशासनाचे भूत अखेर उतरले. मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेली आॅनलाईन निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआता नव्याने होणार निविदा प्रक्रिया

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयीपुरता वापर करू इच्छिणाऱ्या  नागपूर मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) प्रशासनाचे भूत अखेर उतरले. मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेली आॅनलाईन निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोकमत’ने अजब बंगल्यात गजब गोलमाल या मालिकेअंतर्गत येथील आॅनलाईन निविदा प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याची दखल घेत मध्यवर्ती संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ.विराग सोनटक्के यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.आऊटसोर्सिंगने (बाह्ययंत्रणेद्वारे) करावयाच्या पदभरतीसंदर्भात अभिरक्षक मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने दिलेली पहिली निविदा तांत्रिक पेचात फसली होती. ही निविदा वादग्रस्त असल्याचा आरोप बेरोजगार सेवासहकारी संस्थांनी केला होता. यानंतर प्रशासनाने दुसरी निविदा जारी केली होती. मात्र दुसऱ्या  निविदेत (अवैध निविदा) पहिल्या निविदेच्या मूळ प्रारूपात बदल करण्यात आल्याने अडचणीत आली होती.राज्य सरकारच्या शासन निर्णय क्रमांक सीएटी २०१७ /प्र क्र ८/इमा-२ चा मध्यवर्ती संग्रहालयाने आपल्या सोयीपुरता उपयोग केल्याचा आरोप नागपुरातील बेरोजगार संघटनांकडून करण्यात आला होता.मध्यवर्ती संग्रहालयाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आॅनलाईन निविदेच्या अटीत व शर्तीत बदल केला होता. याही निविदेत संग्रहालयाने समन्वयक (सहायक अभिरक्षक) हे पद भरावयाचे असल्याचा उल्लेख केला होता. मात्र या पदाचे देय वेतन किती असेल, याचा उल्लेख नव्हता. याचा मूळ निविदेत मात्र उल्लेख आहे. त्यामुळे कंत्राटदार निविदा सादर करताना गोंधळात पडले होते.नियम काय सांगतो?मुळात शासन निर्णय १२ एप्रिल २०१७ नुसार दुसरी निविदा काढताना मूळ प्रारूप निविदेमध्ये कुठलाही बदल करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मूळ प्रारूप निविदेत कुठलाही बदल न केल्यास नवीन केलेली मागणी ही द्वितीय मागणी समजण्यात येईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. मात्र ६ नोव्हेंबर २०१७ मध्यवर्ती संग्रहालयाने जारी केलेल्या निविदेत अटी-शर्र्ती आणि मूळ प्रारूपात बदल करण्यात आला होता. त्यामुळे या निविदेची ही दुसरी वेळ होती, असे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे होते. कायदेशीररीत्या ही निविदा प्रथमच हवी होती. असे असतानाही ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जारी केलेल्या आॅनलाईन निविदेच्या आधारावर मध्यवर्ती संग्रहालयाकडे दोन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या होत्या. यात नागपुरातील पंचदीप विकास सेवा सहकारी संस्थेला आऊटसोर्सिंग पद्धतीने मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. ते आता अधिकृतरीत्या रद्द करण्यात आले आहे.‘मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेली आॅनलाईन निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निविदा प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या सर्व नियमांचा अभ्यास करीत सुधारित निविदा जारी करण्यात येईल.’- डॉ.विराग सोनटक्केअभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग