शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा! उच्च न्यायालयाचा राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 09:25 IST

उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

 नागपूर : सध्या एकीकडे जीवनरक्षक औषधांचा व ऑक्सिजनचा पुरवठा वाढल्याने आणि दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे परिस्थिती सावरली आहे़ परंतु, असे असले तरी, शांत बसू नका़ कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

यासंदर्भात उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली़ दरम्यान, न्यायालयाने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले़ कोरोनाची तिसरी लाट २ ते १८ व १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींना जास्त प्रभावित करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे़ ही लाट धोकादायक ठरू नये याकरिता नवजात बाळे व लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड तयार करणे, जंबो कोरोना रुग्णालय उभारणे, कस्तुरचंद पार्क, मानकापूर स्टेडियम, विविध शाळांची मैदाने, मंगल कार्यालये यासह विदर्भातील प्रत्येक जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावरील सरकारी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात यावी़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून प्रभावी आराखडा तयार करावा़ तसेच, राज्य सरकारने नवीन एसओपी तयार करावी़ योजना तयार करताना वाणिज्यिक ठिकाणांचा कोरोना रुग्णालय म्हणून उपयोग करू नये असे विविध निर्देशही न्यायालयाने दिले़ या प्रकरणावर आता १९ मे रोजी पुढील सुनावणी होईल़

प्लाझ्माच्या उपयोगितेवर नीरीने संशोधन करावेकोरोना रुग्णांना प्लाझ्मा किती उपयोगी सिद्ध होतो यासंदर्भात तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत़ यावर भिन्न-भिन्न अहवाल उपलब्ध आहेत़ त्यामुळे यासंदर्भात नीरीने संशोधन करून अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला़

इतर आदेश असेरेमडेसिविर उत्पादक कंपन्यांनी त्यांना ठरवून दिलेला कोटा महाराष्ट्राला दिला की नाही, यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे़

विदर्भाला ३१ मेपर्यंत किती जीवनरक्षक औषधांची गरज भासेल आणि सध्या किती औषधे उपलब्ध आहेत याची माहिती अन्न व औषधे प्रशासनाने सादर करावी़कोरोना रुग्णांना ऑक्सिजन देण्याकरिता खासगी सिलिंडर ताब्यात घेण्यासाठी काय कारवाई करण्यात आली याची माहिती मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकार