मेट्रो स्टेशनची कामे झपाट्याने पुर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST2021-02-05T04:54:49+5:302021-02-05T04:54:49+5:30
नागपूर : महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी आज झिरो माईल व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनच्या कामाचा आढावा ...

मेट्रो स्टेशनची कामे झपाट्याने पुर्ण करा
नागपूर : महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी आज झिरो माईल व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मेट्रो रेल्वे स्टेशनची कामे झपाट्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. निरीक्षण दौऱ्याच्या वेळी महामेट्रोचे संचालक महेश कुमार यांनी बृजेश दीक्षित यांना मेट्रो स्टेशनबाबत माहिती दिली. यावेळी महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, कार्यकारी संचालक अनिल कोकाटे, अरुण कुमार, महादेव स्वामी आणि अधिकारी उपस्थित होते. सध्या झिरो माईल मेट्रो स्टेशनचे ९९ टक्के सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे. उर्वरीत कार्य प्रगतीपथावर आहे. त्याशिवाय कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनच्या इमारतीत ४ लिफ्ट, ४ एस्केलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्टेशनच्या पहिल्या माळ्यावर कॉनकोर्स आणि दुसऱ्या माळ्यावर प्लॅटफार्म राहणार आहे.
...............