शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

पोरबंदरच्या पँट्री कारमध्ये गॅस सिलिंडरचा वापर; तपासणीत आढळला धक्कादायक प्रकार

By नरेश डोंगरे | Updated: July 5, 2025 20:23 IST

Nagpur : आरपीएफकडून एकाला अटक; सहा महिन्यातील पाचवी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोरबंदर हावडा एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कार (किचन)मध्ये खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी चक्क प्रतिबंधित गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने या प्रकरणी एकाला रंगेहात पकडले आहे.रेल्वे गाड्यांमध्ये पेट्रोल, डिजेल, रॉकेल स्टोव्ह, सिलिंडर, फटाके अथवा अशाच दुसऱ्या ज्वलनशिल आणि स्फोटक पदार्थांमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कारण यातून पुढे आलेल्या भयावह दुष्परिणामांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये कोणत्याच प्रकारचे विस्फोटक अथवा ज्वलनशिल पदार्थ नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांच्या किचनमध्येही सिलिंडरचा वापर करण्यासही मनाई आहे. तरीसुद्धा अनेक जण लपून छपून ज्वलनशिल, स्फोटक पदार्थांची ने-आण करतात. काही गाड्यांचे पॅन्ट्री मॅनेजर तसेच स्टाफ खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी सिलिंडरचाही अवैधपणे वापर करतात. त्याला रोखण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे महानिरीक्षक मुन्नवर खुर्शिद तसेच सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आरपीएफच्या ठिकठिकाणच्या स्टाफला गाड्यांची कसून तपासणी करण्याचे तसेच कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी, ४ जुलैला आरपीएफच्या गुन्हे गुप्तचर शाखेचे पथक ट्रेन नंबर १२९०५ पोरबंदर हावडा एक्सप्रेसमध्ये तपासणी करीत होते. पॅन्ट्री कारची तपासणी करताना तेथे एक व्यक्ती प्रतिबंधित गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्य पदार्थ तयार करीत असल्याचे दिसून आले. त्याला आरपीएफच्या पथकाने ताबडतोब प्रतिबंध करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून त्याचे ओळखपत्र जप्त करून त्याला राजनांदगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या हवाली करण्यात आले.

सहा महिन्यातील पाचवी कारवाई

रेल्वे गाड्यांमध्ये आग लागू नये, स्फोट होऊ नये यासाठी स्फोटके आणि ज्वलनशिल पदार्थांच्या वाहतूकीवर, वापरावर कडक बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीदेखिल अनेक जण या बंदीला जुमानत नाही. यावर्षी आतापर्यंत फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या एकाला तर सिलिंडरचा वापर करणाऱ्या चार जणांना आरपीएफने अटक करून कोठडीत टाकले आहे.

प्रवाशांना आवाहनरेल्वे गाडीतील आगीचे भयंकर दुष्परिणाम होतात. निरपराध प्रवाशांना त्याची किंमत चुकवावी लागते. त्यामुळे कुणीही रेल्वे गाडीत स्फोटक अथवा ज्वलनशिल पदार्थांची वाहतूक करू नये. कुणी वाहतूक करताना आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलिस, आरपीएफ किंवा रेल्वेच्या हेल्पलाईनवर माहिती द्यावी, असे आवाहन आरपीएफने केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे