शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कचऱ्याचे ढिगारे

By admin | Updated: January 26, 2016 03:36 IST

कचरा संकलन व वाहून नेणाऱ्या वाहनांच्या चालकांनी वेतनवाढीसाठी रविवारपासून संप पुकारला आहे. यावर अद्याप

नागपूर : कचरा संकलन व वाहून नेणाऱ्या वाहनांच्या चालकांनी वेतनवाढीसाठी रविवारपासून संप पुकारला आहे. यावर अद्याप तोडगा न निघाल्याने सोमवारी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत होते. शहरातील कचरा संकलन व वाहून नेण्याची जबाबदारी कनक रिसोर्सेस कंपनीकडे आहे. यासाठी २५० वाहने आहेत. यातील ४० टक्के वाहन चालक संपावरआहेत. त्यामुळे दोन पाळीत कचरा उचलण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कनक व्यवस्थापनाला दिले आहे. संपाचा परिणाम प्रामुख्याने सतरंजीपुरा व मंगळवारी झोन भागात पडला आहे. परंतु मंगळवारपर्यंत यावर तोडगा निघेल, असा विश्वास हर्डीकर यांनी व्यक्त केला. कचरा संकलन न केल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पोलिसांना कल्पना दिल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. ज्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे त्या संघटनेकडून महापालिका प्रशासन अथवा महापौर कार्यालयाला कोणत्याही स्वरूपाची सूचना मिळालेली नाही. हा संप नियमबाह्य असल्याने संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दटके यांनी दिली. कचरा उचलण्याची जबाबदारी कनक यांच्याकडे आहे. परंतु कचरा गोळा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे कनकने महापालिकेची मदत मागितली आहे. महापालिका चालक व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करणार आहे. या मोबदल्यात कंपनीकडून शुल्क वसूल करण्यात येईल. एलबीटीमुळे कंपनीचे आॅगस्ट महिन्यापासून बिल प्रलंबित आहे. परंतु आता नियमित देण्यात येते, अशी माहिती हर्डीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)अर्धाच कचरा उचललाशहरातून दररोज ११०० टन कचरा वाहनांच्या ३०० फेऱ्यांद्वारे संकलित केला जातो. परंतु रविवारी केवळ ७४ फेऱ्या झाल्या. सोमवारी यात थोडी सुधारणा झाली. परंतु दोन पाळीत कचरा उचलण्याचे निर्देश दिल्याने ही समस्या कमी होईल, असे हर्डीकर यांनी सांगितले. नंदनवन पोलिसात गुन्हा दाखलवाहनचालकांनी रविवारी अचानक संप पुकारल्याने सात वाहनचालकांना कमी करण्यात आले आहे. तसेच रविवारी प्रतापनगर, सक्करदरा व पाचपावली येथे प्रत्येकी एका कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सोमवारी नंदनवन पोलिसात एका कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची मदत मागितल्याची माहिती कनक रिसोर्सेसचे प्रमुख कमलेश शर्मा यांनी दिली.