कचरा संकलन यंत्रणा कोलमडली()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST2021-01-13T04:16:57+5:302021-01-13T04:16:57+5:30
एजी एन्व्हायरोच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेतन मिळण्याला होणारा विलंब व आवश्यक सुविधा उपलब्ध ...

कचरा संकलन यंत्रणा कोलमडली()
एजी एन्व्हायरोच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेतन मिळण्याला होणारा विलंब व आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. यामुळे कचरा संकलन कोलमडले. झोन १, २ व ४ मधील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले. कंपनीकडून मनमानी सुरू असल्याचा कामगारांचा आरोप आहे.
कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्तांना मागण्यांसंदर्भात अवगत केले. काही कर्मचाऱ्यांना ११,५०० रुपये तर काहींना १७,५०० रुपये वेतन दिले जाते. ईएसआयसी व्यवस्थित जमा केली जात नाही. गाड्यांचे टायर नादुरुस्त झाले तर कर्मचाऱ्यांना जवळच्या पैशांनी दुरुस्त करावे लागतात, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन व धंतोली झोनचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले नव्हते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कचरा संकलन विस्कळीत होण्याला मनपाचे उपायुक्त (घनकचरा)डॉ. प्रदीप दासरवार यांनीही दुजोरा दिला. धरमपेठ व धंतोली झोनच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले होते. तर हनुमाननगर व नेहरूनगरमधील काम सुरळीत होते. कर्मचाऱ्यांनी वेतनासंदर्भात तक्रार केली आहे. याबाबत कंपनीला स्पष्टीकरण मागितले जाईल, अशी माहिती दिली.