नागपुरातील गँगस्टर शेखूला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:51 IST2019-01-03T00:50:51+5:302019-01-03T00:51:43+5:30
शहरातून तडीपार आणि जाफरनगर निवासी कुख्यात गँगस्टर शेखूला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. ही कारवाई हिंगणा ठाण्यांतर्गत वर्धा रोडवर करण्यात आली.

नागपुरातील गँगस्टर शेखूला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातून तडीपार आणि जाफरनगर निवासी कुख्यात गँगस्टर शेखूला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. ही कारवाई हिंगणा ठाण्यांतर्गत वर्धा रोडवर करण्यात आली.
काही वर्षांपूर्वी शेखूने भाजपा नेते हेमंत दियेवार यांची हत्या शंकरनगर चौकात गोळ्या झाडून केली होती. त्यानंतर लाहोरी हॉटेलसमोर झालेल्या फायरिंगमध्ये तो सहभागी होता. त्याच्यावर हप्ता वसुली, हत्या, दंगे आदींसह अनेक गुन्ह्याची नोंद आहे. तो चंद्रपूर येथे कोळसा तस्करीत लिप्त आहे. त्याच्या टोळीत अनेक गुन्हेगारांचा सहभाग आहे. लाहोरी हॉटेलवर फायरिंगनंतर त्याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो शहरात सक्रिय होता. ३१ डिसेंबरला रात्री इमामवाडा येथे तडीपार गुंडांनी एका युवकाची हत्या केल्यानंतर पोलिसांनी तडीपार आणि फरार आरोपींना पकडण्याची मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत शेखू हिंगणा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी त्याला अटक केली.