नाईक तलाव परिसरात गँगवॉर

By Admin | Updated: February 25, 2015 02:40 IST2015-02-25T02:40:17+5:302015-02-25T02:40:17+5:30

नाईक तलाव परिसरात जुगार अड्ड्यावरून झालेल्या भांडणात एक युवक गंभीर जखमी झाला. त्यामुळे दोन टोळ्यांनी एकमेकांविरोधात हल्लाबोल केला.

Gangovor in the Naik Lake area | नाईक तलाव परिसरात गँगवॉर

नाईक तलाव परिसरात गँगवॉर

नागपूर : नाईक तलाव परिसरात जुगार अड्ड्यावरून झालेल्या भांडणात एक युवक गंभीर जखमी झाला. त्यामुळे दोन टोळ्यांनी एकमेकांविरोधात हल्लाबोल केला. हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
जखमी युवकाचे नाव केशरी सोनवाई आहे. नाईक तलाव परिसरातील बैरागीपुरा येथे तो राहतो. याच परिसरातून जाणाऱ्या कोलकाता रेल्वे लाईनजवळ इंदर नावाचा युवक जुगार अड्डा चालवितो. त्या युवकाशी केशरी सोनवाई याचा वाद सुरू होता. गेल्या चार-पाच महिन्यापासून दोघांमध्ये बरेचदा मारापीटही झाली. मंगळवारी सकाळी १० वाजता इंदरच्या साथीदारांनी मराठे चौकात केशरी सोनवाई याच्यावर फरशाने वार केला. यात त्याच्या डाव्या हाताचा अंगठा कापला गेला. त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच केशरीच्या सहकाऱ्यांनी त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या घटनेचा बदला घेण्यासाठी केशरीच्या सहकाऱ्यांनी इंदरच्या घरावर हल्ला केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. जुगार अड्ड्यामुळे नाईक तलाव येथील नागरिक त्रस्त असल्याचे सूत्राने सांगितले.
पोलिसांकडे बरेचदा तक्रार केल्यानंतरही कुठलीही कारवाई होत नाही, त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Gangovor in the Naik Lake area