शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीकच्या वाडी भागात मतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 19:42 IST

वाडी पोलीस ठाणे अंतर्गत एका मतिमंद तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या नातेवाईकाच्या तक्रारीवर आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), एफ, जे एन, एल, ५०६ ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देआरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : पीडित आठ महिन्यांची गर्भवती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी पोलीस ठाणे अंतर्गत एका मतिमंद तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या नातेवाईकाच्या तक्रारीवर आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), एफ, जे एन, एल, ५०६ ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.व्यंकटेश कलराम पप्सलेटी (३२) रा. गरवाल जि. करनूल (तेलंगणा) आणि रामू गोपाल बोई (२६) रा. गणेशपूर सोलापूर रोड उस्मानाबाद अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे पीडित तरुणीचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. पीडित तरुणी ही आठ महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले जाते. पोलीस सूत्रानुसार २५ वर्षीय मतिमंद तरुणीशी एप्रिल ते जून २०१८ दरम्यान आरोपींनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी हे नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. या दरम्यान आरोपीची मतिमंद तरुणीशी भेट झाली. दोघांनीही तिच्या मतिमंद होण्याचा गैरफायदा घेऊन तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणी या दरम्यान गर्भवती झाली. हा प्रकार उघडकीस येताच याबाबत पीडित तरुणी व तिच्या नातेवाईकांनी आपसात समेट घडवून आणण्यासाठी समाजाची बैठक बोलावली. या बैठकीत पीडित मुलीला कुठलाही न्याय मिळाला नाही. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.भाषेचा अडसरपोलीस सूत्रानुसार पीडित तरुणी आणि तिचे नातेवाईक जेव्हा तक्रार दाखल करण्यासाठी ठाण्यात आले, तेव्हा ते दक्षिण भारतीय भाषा (तेलगू) बोलत होते. त्यामुळे पोलिसांना त्यांची भाषा समजत नव्हती. पीडित तरुणी तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगू शकत नव्हती. पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. पीडित तरुणीसमोर आरोपी व्यकंटेश अचानक आल्याने ती त्याच्याकडे इशारा करू लागली. तेव्हा तिला नातेवाईकांनी प्रेमाने विचारले असता तिने कुटुंबीयांना आपबिती सांगितली.मतिमंद असल्याचा उचलला फायदाआरोपींना माहिती होते की तरुणी मतिमंद आहे. ती त्यांचे नाव सांगू शकणार नाही. याचा फायदा उचलत तिच्यावर आरोपींनी सामूहिक अत्याचार केला. पीडित तरुणीने जेव्हा व्यंकटेशला अचानक समोर पाहिले तेव्हा तिची प्रकृती बिघडली. रुग्णालयात गेल्यावर ती गर्भवती असल्याचे समजले. कुटुंबीयांनी आरोपीला जाब विचारला. त्यांच्यावर बराच दबाव टाकला तेव्हा त्यांनी अत्याचार केल्याची कबुली दिली. सुरुवातीला हे प्रकरण आपसात सोडवण्याचा प्रयत्न झाला. यासाठी सामाजिक स्तरावर बैठक घेण्यात आली. परंतु त्यात न्याय न मिळाल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार