प्रवाशांचे मोबाइल पळविणाऱ्या टोळीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:09 IST2021-03-06T04:09:05+5:302021-03-06T04:09:05+5:30
नागपूर : प्रवाशांचे मोबाइल पळविणाऱ्या टोळीला लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक करून, त्यांच्याकडून २ लाख १६ हजार रुपये ...

प्रवाशांचे मोबाइल पळविणाऱ्या टोळीस अटक
नागपूर : प्रवाशांचे मोबाइल पळविणाऱ्या टोळीला लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक करून, त्यांच्याकडून २ लाख १६ हजार रुपये किमतीचे ११ मोबाइल जप्त केले आहेत.
नागपूर रेल्वे स्थानकावर सेकंड क्लास बुकिंग ऑफिस परिसरातून सचिन नगराळे या प्रवाशाचा ९ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीला गेला होता. त्याची तक्रार त्यांनी लोहमार्ग पोलिसात केली होती. मोबाइल चोरीचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा करीत होती. त्यानंतर, शुक्रवारी सी कॅबिन परिसरात आरोपी चंदू मिस्त्रीलाल मुंगीया, शंकरकिसन चव्हाण, पिंट्या बब्बू सोळंकी, अरुण रामदास मुंगीया रा.एलआयसी चौक हे संशयास्पदरीत्या बसलेले दिसले. आरोपींनी विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता, त्यांनी मोबाइलच्या चोरीची कबुली दिली. आरोपींकडून २ लाख १६ हजार रुपये किमतीचे ११ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. हे मोबाइल त्यांनी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पळविले आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पटले, शैलेश उके, पुष्पराज मिश्रा, रोशन मोगरे, चंद्रशेखर मदनकर, प्रवीण खवसे, योगेश धुरडे, मुकेश नरुले यांनी केली.
...............