कार्यशाळेत साकारल्या गणेश मूर्ती
By Admin | Updated: August 21, 2014 01:09 IST2014-08-21T01:09:21+5:302014-08-21T01:09:21+5:30
लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व कॅम्पस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मातीचे गणपती बनविण्याची व विविध कलाकृतीच्या कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेत साकारल्या गणेश मूर्ती
लोकमत सखी मंच : क्लेच्या वस्तूंचेही प्रशिक्षण
नागपूर : लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व कॅम्पस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मातीचे गणपती बनविण्याची व विविध कलाकृतीच्या कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.
१५ दिवसांच्या या कार्यशाळेत ‘जलप्रदूषण दूर करू या, मातीचे गणपती बसवू या’, चला गणेश बनवू या स्लोगनतंर्गत लहानापासून मोठ्यापर्यंतच्या सगळ्यांनी विविध आकारातील गणेश मूर्ती बनविल्या. या मूर्ती मातीच्या असल्यातरी त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव कसे साकारावे याचे प्रशिक्षण कार्यशाळेत देण्यात आले.
क्लेपासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण चंद्रकांत चकोले यांनी दिले.
यामध्ये त्यांनी क्लेपासून स्कल्पचर, बेसिक ते पेंटिंग रंग कोणते व कसे वापरावे.
अॅम्बॉस, म्युरल, राजस्थानी मास्क, शमा मास्क डिझाईन, कटआऊट पद्धत, त्यासाठी लागणारे रंग कोणते वापरावे व कसे वापरावे याच्याही त्यांनी टीप्स त्यांनी दिल्या.
पॉट मेकिंग, (आधुनिक पद्धत) सावी वर्क, स्ट्रोक वर्क, अलादिन चिराग, कार्टुन मास्क, शमा मास्क तसेच हडप्पाकालीन शस्त्रे व आभूषणे आदी प्रकार या कार्यशाळेत शिकविण्यात आले.(प्रतिनिधी)