शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नागपुरात हायटेन्शन लाईनखाली जीवघेणा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 9:24 PM

नियमानुसार हायटेन्शन लाईन खाली कुठलेही बांधकाम करता येत नाही. एखादा अपवाद वगळल्यास हायटेन्शन लाईन खालून रस्ता सुद्धा बांधता येत नाही. परंतु दाभा येथील सेंटर पॉर्इंट स्कूलने खास शाळेसाठी २०० मीटरचा रस्ता हायटेन्शन लाईनखाली बांधला आहे. या रस्त्याच्या खालून शाळेची शेकडो वाहने दररोज अवागमन करतात. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा जीवघेणा खेळ सुरू आहे.

ठळक मुद्देनियम डावलून सेंटर पॉर्इंट शाळेने बनविला रस्ता : प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियमानुसार हायटेन्शन लाईन खाली कुठलेही बांधकाम करता येत नाही. एखादा अपवाद वगळल्यास हायटेन्शन लाईन खालून रस्ता सुद्धा बांधता येत नाही. परंतु दाभा येथील सेंटर पॉर्इंट स्कूलने खास शाळेसाठी २०० मीटरचा रस्ता हायटेन्शन लाईनखाली बांधला आहे. या रस्त्याच्या खालून शाळेची शेकडो वाहने दररोज अवागमन करतात. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा जीवघेणा खेळ सुरू आहे. शाळेच्या अरेरावीला ना शिक्षण विभाग ना महापारेषण थांबवू शकले. विशेष म्हणजे शाळेच्या एका भागातून हजारो होल्टेजच्या या तारा अगदी जवळून गेल्या आहे. त्यामुळे भविष्यात ही शाळा कदाचित गंभीर घटनेचे कारण ठरू नये.विशेष म्हणजे नियमांकडे दुर्लक्ष करून शाळेचे निर्माणकार्य करण्यात आले आहे. याची माहिती प्रशासनाला आहे. त्यानंतरही शाळेवर कुठलीही कारवाई अथवा नोटीस सुद्धा दिलेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हे अधिकारीही एखाद्या घटनेची वाट बघत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दाभ्याच्या टेकडीवर सेंटर पॉर्इंट स्कूलची भव्य इमारत आहे. शाळेला प्रवेशासाठी मार्गच नाही. शाळेच्या अगदी समोरून हायटेन्शन लाईन गेलेली आहे. या टेकडीच्या परिसरात ले-आऊट पडलेले आहे, मात्र कुठेही बांधकाम झालेले नाही. त्यामुळे रस्त्याचा प्रश्नच नाही. वस्तीच नसल्याने रस्त्याची कुणाचीही मागणी नाही. परंतु सेंटर पॉर्इंट स्कूलने हायटेन्शन लाईनच्या अगदी खाली खास शाळेसाठी पक्का डांबरी रस्ता बनविला आहे. या रस्त्याच्या मधोमध हायटेन्शन लाईनचे मोठमोठे टॉवर आहे. लाईनच्या तारा लोंबकळलेल्या दिसतात. अशा जीवघेण्या लाईनच्या खालून दररोज शाळेच्या शेकडो वाहनांचे आवागमन होते. यात स्कूल बसेस, चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या संपूर्ण रस्त्यावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलेही उपाय केलेले नाही. मुलांना शाळेत लवकर सोडण्यासाठी या रस्त्यावरून वाहने वेगाने धावतात. शाळा सुटल्यानंतरही अशीच अवस्था असते. या रस्त्यावर हायटेन्शन लाईनचे मोठमोठे टॉवर उभारले आहे. वाहनांचा वेग लक्षात घेता, एखादे वाहन टॉवरवर आदळून अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्यावर पथदिवे नाहीशाळेने आपल्या सोईसाठी २०० मीटरच्या जवळपास जो रस्ता बनविला आहे, त्या रस्त्यावर टॉवरचा अडथळा असतानाही पथदिव्यांची सोय केलेली नाही. विशेषत: या शाळेत आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम रात्रीपर्यंत चालतात. हायटेन्शन लाईनजवळ कुठल्याच प्रकारचे बांधकाम नकोमहापारेषणचे मुख्य अभियंता व्ही. बी. बढे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की हायटेन्शन लाईनच्या जवळपास कुठल्याच प्रकारचे बांधकाम करणे चुकीचे आहे. विशेष म्हणजे शाळा तर असायलाच नको. त्यांना सेंटरपॉर्इंट शाळेबद्दल विचारले असता, त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना शाळेचे निरीक्षण करण्यास सांगितले. त्यांच्या अहवालावर पुढची कारवाई करण्यात येईल. ते म्हणाले की महापारेषण हायटेन्शन लाईनपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी आम्ही जागरूकता अभियान राबवित आहोत. लोकांनी पुढे येऊन असे प्रकार आम्हाला सांगावे.

टॅग्स :nagpurनागपूर