भर दुपारी दुकानात जुगार, चार आरोपींना रंगेहाथ अटक
By योगेश पांडे | Updated: March 23, 2024 15:50 IST2024-03-23T15:50:16+5:302024-03-23T15:50:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जुगार खेळणाऱ्या चार आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिमंडळ पाचच्या ...

भर दुपारी दुकानात जुगार, चार आरोपींना रंगेहाथ अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुगार खेळणाऱ्या चार आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिमंडळ पाचच्या उपायुक्तांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
२२ मार्च रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पथक गस्तीवर असताना खबऱ्यांच्या नेटवर्कमधून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी टेकानाका ते नारी मार्गावरील अंकुऊ प्लाझा येथील दुकान क्रमांक तीनवर धाड टाकली. तेथे योगेश हेमराज पारवे (४५), आतिश श्यामराव सहारे (३९), सूरज गजराज पाल (२७) व विशाल हरीदास शंभरकर (३४) हे जुगार खेळताना आढळले. तर राजेश नंदनवार (मानेवाडा) हा फरार झाला.
पोलिसांनी तेथून ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर आरोपींविरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, अरुण चांदणे, रविकुमार शाहू, रविंद्र गावंडे, योगेश ताथोड, विवेक दोरशेटवार, विजय गिते, शारीक खान यांच्या पथकाने ही कारवाई केली.