गजानन महाराज मूर्ती स्थापना दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:23+5:302021-02-14T04:09:23+5:30
वाडी : नजीकच्या नागलवाडी येथील श्री सद्गुरू गजानन महाराज सेवाश्रम (ट्रस्ट)च्यावतीने १६ वर्षांपूर्वी स्थापना केलेल्या श्री गजानन महाराजांच्या मूर्ती ...

गजानन महाराज मूर्ती स्थापना दिवस
वाडी : नजीकच्या नागलवाडी येथील श्री सद्गुरू गजानन महाराज सेवाश्रम (ट्रस्ट)च्यावतीने १६ वर्षांपूर्वी स्थापना केलेल्या श्री गजानन महाराजांच्या मूर्ती स्थापना दिनानिमित्त नागलवाडी येथे शुक्रवारी (दि. १२) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
यानिमित्त सकाळी ८ वाजता पूजा करण्यात आली. सकाळी ११ वाजता श्रींची आरती, दुपारी हरिपाठ व भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला व सायंकाळी श्रींची पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. महाप्रसाद वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर येथे प्रत्येकाला फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले हाेते. संस्थानच्यावतीने प्रवेशद्वाराजवळ हात सॅनिटाईझ करण्याची व्यवस्थही केली हाेती. भाविकांना शिस्तीने दर्शनासाठी आत साेडण्यात आले हाेते. त्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली. यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव महेश कुलकर्णी, प्रकाश फडनाईक, राजू पुजारी, संजय देशमुख यांच्यासह भाविकांनी सहकार्य केले.