सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:58+5:302021-03-26T04:09:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : न्यू नरसाळा भागातील एका बहुमजली इमारतीत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक ...

Gajaad women operating sex rackets | सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला गजाआड

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : न्यू नरसाळा भागातील एका बहुमजली इमारतीत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी सायंकाळी अटक केली.

शिल्पा मनीष दलाल (वय ३६) आणि कांता सुनील सनोडिया (वय ४५) अशी या महिला आरोपींची नाव आहे.

त्यांनी काही महिन्यांपूर्वी नरसाळ्यातील स्वागत नगरात प्रज्ञा अपार्टमेंटच्या चौथ्या माळावर फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथे त्या ग्राहकांना वेश्या पुरवीत होत्या. ही माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक रवि नागोसे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी शहानिशा करून घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी ४च्या सुमारास पंटर पाठविला. त्याने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलांकडे वारांगनेबाबत विचारपूस केली. दीड हजार रुपयात वारांगना उपलब्ध करून देण्याची तयारी शिल्पा आणि कांताने दाखवली. त्यानुसार पोलिसाच्या पंटरने वारांगनेसोबत रूम गाठली आणि ठरल्याप्रमाणे काही वेळातच एसएसबीच्या पथकाने तेथे छापा घातला. या दोघींना अनैतिक कृत्य चालविण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या त्या महिलेची चौकशी करून तिला पोलिसांनी मुक्त केले.

---

पोलीस निरीक्षक रवि नागोसे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, मंगला हरडे, हवालदार अनिल अंबादे, रशीद शेख, भूषण अजय आणि लीना त्यांनी कामगिरी बजावली.

Web Title: Gajaad women operating sex rackets