ठाणेदार बाेरकुटे यांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST2021-02-23T04:13:40+5:302021-02-23T04:13:40+5:30

देवलापार : अलीकडच्या काळात गुरांची अवैध वाहतूक आणि त्यांना कत्तलखान्यात नेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, देवलापार पाेलिसांनी आजवर केलेल्या ...

Gairav of Thanedar Barkute | ठाणेदार बाेरकुटे यांचा गाैरव

ठाणेदार बाेरकुटे यांचा गाैरव

देवलापार : अलीकडच्या काळात गुरांची अवैध वाहतूक आणि त्यांना कत्तलखान्यात नेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, देवलापार पाेलिसांनी आजवर केलेल्या विविध कारवाईमध्ये गुरांच्या अवैध वाहतुकीची वाहने पकडून एक हजारपेक्षा अधिक गुरांचे प्राण वाचविले आहे. त्यामुळे देवलापार(ता. रामटेक)चे ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांचा देवलापार पाेलीस ठाण्याच्या आवारात आयाेजित छाेटेखानी कार्यक्रमात गाैरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयाेजन गोवंश पब्लिक युटिलिझेशन ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आले हाेते. देवलापार गाव व पाेलीस ठाणे नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर असून, या पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून मध्यप्रदेशातील गुरांची कामठी, नागपूर व हैदराबादच्या दिशेने अवैध वाहतूक केली जाते. ठाणेदार प्रवीण बाेरकुटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरांच्या अवैध वाहतुकीची वाहने पकडून याला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जाेपासत त्यांचा गाैरव करण्यात येत असल्याची माहिती आयाेजकांनी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुमत लल्ला जैन, कोषाध्यक्ष सुरेश आगरेकर, डॉ. चंद्रनाथ भागवतकर, देवलापारच्या सरपंच शाईस्ता पठाण, पोलीस पाटील संजय जैन, पुरुषोत्तम डडमल, मोईन पठाण, पंकज मासुरकर यांच्यासह संस्थेचे सदस्य, नागरिक व पाेलीस कर्मचारी उपस्थित हाेते.

Web Title: Gairav of Thanedar Barkute