‘गेल’ची गॅस २०२३ च्या मध्यापर्यंत घरोघरी पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 08:00 AM2022-11-04T08:00:00+5:302022-11-04T08:00:06+5:30

Nagpur News गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे (गेल) टाकण्यात येणारी नैसर्गिक वायूची पाईपलाईन २०२३ च्या मध्यापर्यंत मुंबईहून नागपूरला पोहोचणार आहे.

GAIL gas will reach homes by mid-2023 | ‘गेल’ची गॅस २०२३ च्या मध्यापर्यंत घरोघरी पोहोचणार

‘गेल’ची गॅस २०२३ च्या मध्यापर्यंत घरोघरी पोहोचणार

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरला मिळणार पाईपद्वारे गॅस

 

आशिष रॉय

नागपूर : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे (गेल) टाकण्यात येणारी नैसर्गिक वायूची पाईपलाईन २०२३ च्या मध्यापर्यंत मुंबईहून नागपूरला पोहोचणार आहे. पाईपलाईन समृद्धी महामार्गालगत टाकण्यात येत असून, ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) महामार्गाच्या निर्मितीसाठी कसाराजवळ ब्लास्टिंग करत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आमचे काम थांबले आहे. त्यानंतरही वेळेनुसार पाईपलाईन नागपूरला पोहोचणार असल्याची माहिती ‘गेल’च्या अधिकृत सूत्रांनी दिली. गेलची पाईपलाईन शहराजवळ आल्यानंतर नागपूरला पाईपद्वारे गॅस मिळू शकेल. बुटीबोरीतील उद्योगांनाही इंधन मिळणार आहे. हरियाणा सिटी गॅसला (एचसीजी) शहरात पाईप्ड नैसर्गिक वायूचे वितरण करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे आणि ते येथे पोहोचण्यासाठी गेलच्या पाईपलाईनची वाट पाहत आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) १,७५५ किलोमीटर लांबीच्या मुंबई-नागपूर-झारसुगुडा आणि नागपूर-जबलपूर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम ‘गेल’ला दिले आहे. या प्रकल्पाची किंमत ७,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबई-नागपूर पाईपलाईनचा व्यास २४ इंच (२ फूट) आहे, तर नागपूर-झारसुगुडा पाईपलाईनचा व्यास १८ इंच आहे. मुंबई-नागपूर-झारसुगुडा पाईपलाईन महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांतून जाणार आहे.

मुंबई-नागपूर पाईपलाईन मुंबई-औरंगाबाद, औरंगाबाद-वाशीम आणि वाशीम-नागपूर अशा तीन पॅकेजमध्ये विभागली गेली आहे. तिन्ही पॅकेजचे काम वेगाने सुरू आहे. ही पाईपलाईन समृद्धी महामार्गाचा प्रारंभ बिंदू शिवमडका येथून जाईल. शिवमडका येथून शहराला पुरवठा करण्यासाठी एचसीजीला पाईपलाईन टाकावी लागेल. बुटीबोरी एमआयडीसीला पुरवठा करण्यासाठी आम्ही ९ किमी लांबीची पाईपलाईन टाकणार असल्याचे गेलच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

प्राथमिक निर्णयात गुजरात ते ओडिशा राज्यापर्यंतचा १५४० कि.मी.चा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्हांसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना मिळावा, यासाठी संबंधित कंपनीकडे पाठपुरावा केला होता. त्याची आता फलश्रुती झाली आहे.

- प्रफुल्ल पटेल, खासदार

Web Title: GAIL gas will reach homes by mid-2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.