लोककल्याण, राष्ट्रसंवर्धनासाठी गडकरी यांचे महादेवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 10:56 IST2019-08-13T10:55:52+5:302019-08-13T10:56:17+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोककल्याण आणि राष्ट्र संवर्धनाकरिता देवाधिदेव महादेवाला साकडं घातलं.

Gadkari worships God Mahadeva for public welfare, national welfare | लोककल्याण, राष्ट्रसंवर्धनासाठी गडकरी यांचे महादेवाला साकडे

लोककल्याण, राष्ट्रसंवर्धनासाठी गडकरी यांचे महादेवाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोककल्याण आणि राष्ट्र संवर्धनाकरिता देवाधिदेव महादेवाला साकडं घातलं. भारत विकास परिषदेच्या दक्षिण पश्चिम शाखेच्यावतीनं लघुरुद्र आणि जलाभिषेक कार्यक्रमाचं आयोजन हिंगणा नाका परिसरातील ब्लाईंड रिलिफ असोसिएशनच्या शिवमंदिरात करण्यात आले होते. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी शिवअर्चना केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुळकरी यांनी गडकरींचे स्वागत केले. प्रसंगी वेदशाळेच्या बाल-किशोर विद्यार्थांनी लघुरुद्र पठन केले. गडकरी यांनी या बाल-किशोर विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
भारत विकास परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर घुसे, सचिव सीमा मुनशी, कोष अधिकारी संजय गुळकरी, नगरसेवक संजय बंगाले यावेळी उपस्थित होते.

Web Title: Gadkari worships God Mahadeva for public welfare, national welfare