नागपुरात गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 10:11 IST2018-09-12T10:10:31+5:302018-09-12T10:11:25+5:30

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

Gadkari visits Bhagvat in Nagpur | नागपुरात गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

नागपुरात गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

ठळक मुद्देवाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.
दोघांमध्ये नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा झाली, हे कळू शकले नाही. मात्र डॉ. भागवत यांचा मंगळवारी ६८ वा वाढदिवस होता. त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गडकरी यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघात व्यक्तिपूजनाला स्थान नाही. त्यामुळे गडकरी यांनी केवळ शुभेच्छा देण्यासाठीच डॉ. भागवत यांची भेट घेतली की आणखी काही कारण होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरसंघचालक मागील आठवड्यात शिकागो येथील विश्व हिंदू संमेलनात सहभागी झाले होते व नुकतेच ते मुख्यालयात परतले आहेत.

Web Title: Gadkari visits Bhagvat in Nagpur