नाट्यपरीक्षण समितीवर गडेकर, तिडके, देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:10 IST2021-01-23T04:10:11+5:302021-01-23T04:10:11+5:30

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेंतर्गत नाट्यपरीक्षण समिती ...

Gadekar, Tidke, Deshmukh on Natyaparikshan Samiti | नाट्यपरीक्षण समितीवर गडेकर, तिडके, देशमुख

नाट्यपरीक्षण समितीवर गडेकर, तिडके, देशमुख

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेंतर्गत नाट्यपरीक्षण समिती आहे. या समितीच्या सदस्यपदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, प्रसिद्ध नाट्यनिर्माती व अभिनेत्री आसावरी तिडके आणि वाशिमचे उज्ज्वल देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड तीन वर्षांसाठी आहे. शासनाच्या नाट्यविषयक अनुदानाच्या तपासणीचे काम ही समिती करत असते. या समितीवर शफाअत खान, विनिता पिंपळखरे, सविता मालपेकर, विजय गोखले, अशोक समेळ, पुरुषोत्तम बेर्डे, प्रकाश पायगुडे, शोभा बोल्ली, आनंद कुळकर्णी, संजय देवळाणकर, समीर इंदूलकर, संदीप जंगम, कौस्तुभ सावरकर, सचिन शिंदे, श्यामनाथ पुंडे, विलास कुळकर्णी, संजय उबाळे, शंभू पाटील यांचीही निवड झाली आहे.

.........

Web Title: Gadekar, Tidke, Deshmukh on Natyaparikshan Samiti