कामगारांचा भविष्य निर्वाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:42+5:302021-01-03T04:11:42+5:30
सैनिक माईन्स व एनसीसी कंपनी येथील प्रकार उमरेड : वेकोलि मकरधोकडा दिनेश खदान क्रमांक ३ अंतर्गत सैनिक माईन्स व ...

कामगारांचा भविष्य निर्वाह
सैनिक माईन्स व एनसीसी कंपनी येथील प्रकार
उमरेड : वेकोलि मकरधोकडा दिनेश खदान क्रमांक ३ अंतर्गत सैनिक माईन्स व एनसीसी कंपनीच्या माध्यमातून कर्तव्य पार पाडणाऱ्या कामगारांना भविष्य निर्वाह निधी मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. हा निर्वाह निधी कुणाच्या घशात जातो, असा सवाल विचारला जात आहे. याबाबतची तक्रार आ. राजू पारवे यांच्याकडेही करण्यात आली आहे. उपरोक्त दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ५०० कामगार वेकोलि खदान येथे कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या कामगारांकडून काम करून घेतल्यानंतर त्यांना नियमानुसार योग्य वेतन दिल्या जात नाही. शिवाय याठिकाणी परप्रांतीय कामगारांचाच अधिक भरणा असल्याचीही बाब पारवे यांच्या ध्यानात आली. भोजन, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह आदींची गंभीर समस्या याठिकाणी आढळून आली. शिवाय कामगार उघड्यावरच अंघोळ करतात, असेही चित्र येथे दिसून आले. या समस्या तातडीने सोडवाव्यात. सोबतच वेतन आणि भविष्य निर्वाह निधीच्या समस्येकडेसुद्धा लक्ष देण्याची सूचना पारवे यांनी केली. यावेळी जितेंद्र गिरडकर, रामेश्वर सोनटक्के तसेच हेवती, मकरधोकडा, शिरपूर, खुर्सापार, उमरेड, गांगापूर येथील तरुणांची उपस्थिती होती.