तोंडाने वायर तोडणे बेतले जिवावर, फर्निचर कारागिराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2022 20:58 IST2022-12-14T20:57:51+5:302022-12-14T20:58:27+5:30
Nagpur News काम करत असताना तोंडाने विजेची वायर तोडणे एका फर्निचर कारागिराच्या जिवावर बेतले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तोंडाने वायर तोडणे बेतले जिवावर, फर्निचर कारागिराचा मृत्यू
नागपूर : काम करत असताना तोंडाने विजेची वायर तोडणे एका फर्निचर कारागिराच्या जिवावर बेतले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली.
अभिषेक राजेशकुमार चव्हाण (१९, विश्वकर्मानगर) असे मृताचे नाव आहे. तो फर्निचर कारागीर होता. वामननगरी येथे त्याचे काम सुरू होते. फर्निचरचे काम करत असताना प्लाय कापण्याच्या मशीनची वायर तुटली. ती जोडण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. वायरला परत जोडण्यासाठी त्याने तोंडानेच वायरचा तुकडा तोडायला सुरुवात केली; परंतु विजेचा प्रवाह सुरूच होता. त्याकडे त्याचे दुर्लक्ष झाले. वायर तोंडात असतानाच त्याला विजेचा जोरदार शॉक बसला व तो जागेवरच बेशुद्ध झाला. त्याला तातडीने खामल्यातील एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. राजेशकुमार यादव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.