शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यदर्शन शक्य; शवदेखील करता येणार सॅनिटाईज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 1:16 PM

कमीतकमी आप्तस्वकियांना आपल्या जवळच्या व्यक्तीचे अंत्यदर्शन घेता यावे या विचारातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी संशोधन केले आहे. यामुळे कोरोनाबाधितांचे शव व शवपेटीचे अल्ट्राव्हायोलेट किरणांनी निर्जंतुकीकरण करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला असताना मृतांच्या अंत्यसंस्कारादरम्यानदेखील बऱ्याच अडचणी येत आहेत. संक्रमण होऊ नये यासाठी मृतदेहाचे अंत्यदर्शनदेखील घेता येत नसल्याची स्थिती आहे. कमीतकमी आप्तस्वकियांना आपल्या जवळच्या व्यक्तीचे अंत्यदर्शन घेता यावे या विचारातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी संशोधन केले आहे. यामुळे कोरोनाबाधितांचे शव व शवपेटीचे अल्ट्राव्हायोलेट किरणांनी निर्जंतुकीकरण करता येणार आहे.नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय जानराव ढोबळे, दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. नीलेश महाजन व सेवादल महिला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. निरुपमा संजय ढोबळे यांनी एकत्र येऊन हे उपकरण तयार केले आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे अंत्यसंस्कार फक्त सरकारी कर्मचारी किंवा समाजसेवक अथवा तीन ते चार व्यक्ती करीत आहेत. अचानक कोरोनामुळे मृत्यू होतो तेव्हा संबंधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला कुणीच उपस्थित राहत नाही. कोरोनाबाधित मृत व्यक्तीजवळ जाणे योग्य नाही. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती असते शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सोबतच मृतदेहांची ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील धोका असतो. हीच बाब लक्षात घेऊन तिन्ही प्राध्यापकांनी मृतदेहासाठी विशेष कॅबिनेटची निर्मिती केली आहे.

या कॅबिनेटमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या मदतीने मृतदेह किंवा त्याच्यावरील आवरणाचे निर्जंतुकीकरण करता येते. यामुळे त्या मृतदेहाजवळ नातेवाईक, मित्र ठराविक अंतरापर्यंत जाऊन नमस्कार करू शकतात तसेच फुले अर्पण करू शकतात. एवढेच नव्हे तर जी व्यक्ती कर्तव्याने अंत्यसंस्कारासाठी पुढे येते त्यांचा सुद्धा कोरोनापासून बचाव होतो. विविध रसायनांपेक्षा ही प्रणाली जास्त प्रभावी ठरते, असा दावा त्यांनी केला आहे. संशोधकांनी पेटंटसाठीदेखील नोंदणी केली असून एक युनिट मेडिकललादेखील देण्यात आले आहे.असे काम करते कॅबिनेटमृतदेहांचे निर्जंतुकीकरण करणारे कॅबिनेट हे स्टेनलेस स्टीलचे बनले असून त्यात अल्ट्राव्हायोलेट लॅम्प लावण्यात आले आहेत. कॅबिनेटच्या वरील व खालच्या बाजूला हे लॅम्प आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी नेट स्टँड स्ट्रेचर ठेवण्यात आले आहे. लाईट सुरू केल्यानंतर १५ मिनिटांत मृतदेहाच्या बाह्यभागाचे निर्जंतुकीकरण होऊ शकते, असा दावा डॉ.ढोबळे यांनी केला आहे. मृत शरीर उपकरणातून बाहेर काढल्यानंतर पुन्हा उपकरणाचे निर्जंतुकीकरण केले जाते. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस