लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका कार्यक्षेत्रातील दहनघाटावर पुढील दोन वर्षाकरिता लाकडाचा पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे निविदा काढली जाणार आहे. यात जुन्या दरानुसार प्रत्येकी ३०० किलो लाकडासाठी २२११ रुपये आकारले जाणार आहे. महापालिकेच्या घाटांवर २०१७-१८ या वर्षात १३,७७२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.महापालिकेच्या १२ दहनघाटावर अंतिम संस्कारासाठी लाकडाचा मोफत पुरवठा केला जातो. २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी ३०० किलो लाकडाचा पुरवठा करण्यात आला असून, यासाठी महापालिकेला प्रत्येकी २२११ रुपये खर्च करावे लागले. दहनघाटाववर लाकडाचा पुरवठा कामठी येथील मे. जनता सॉ मिल आणि मे. भूपेश नीलकंठराव चामट यांच्यातर्फे करण्यात आला. याबाबतच्या निविदेचा कालावधी ३ आॅगस्ट २०१८ रोजी संपला. दहनघाटावरील लाकडाचा पुरवठा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने याबाबतच्या निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. स्थायी समितीच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.२०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात १३,७७२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेला ३ कोटी ४ लाख ५ हजार ९७४ रुपये खर्च करावा लागला. कमी दरावर काम करण्याची तयारी दर्शविल्यास दोन कंत्राटदारांना काम दिले जाणार आहे. तोपर्यंत जुन्या कंत्राटदारांकडे लाकूड उपलब्ध करण्याची जबाबदारी कायम राहणार आहे.भरतावाडा व कळमना घाटावरही सुविधाभरतवाडा व कळमना घाटावरसुद्धा आता महापालिका मोफत लाकूड उपलब्ध करणार आहे. या घाटांचा नवीन निविदेत समावेश करण्यात आला आहे. कंत्राटदाराला घाटावर वजनकाटा व लाकूड वाहून नेण्याची व्यवस्था करावयाची आहे.
नागपुरात वर्षभरात १३,७७२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:51 IST
महापालिका कार्यक्षेत्रातील दहनघाटावर पुढील दोन वर्षाकरिता लाकडाचा पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे निविदा काढली जाणार आहे. यात जुन्या दरानुसार प्रत्येकी ३०० किलो लाकडासाठी २२११ रुपये आकारले जाणार आहे. महापालिकेच्या घाटांवर २०१७-१८ या वर्षात १३,७७२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
नागपुरात वर्षभरात १३,७७२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
ठळक मुद्देअंत्यसंस्कारासाठी प्रत्येकी ३०० किलो लाकूड मोफत