नागपूरच्या न्यायालयासमोरच वकिलावर कुऱ्हाडीने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 18:01 IST2018-12-21T17:59:20+5:302018-12-21T18:01:53+5:30
महाराष्ट्राची उपराजधानी गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे हादरली आहे.

नागपूरच्या न्यायालयासमोरच वकिलावर कुऱ्हाडीने हल्ला
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे हादरली आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयासमोरच एका वकिलावर कुऱ्हाडीचे वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
अॅड. सदानंद नारनवरे असे जखमीचे नाव असून लोकेश भास्कर याने हा हल्ला केला. नारनवरे हे नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागाचे निवृत्त प्राध्यापक होते. भास्कर याने नुकतीच वकीलीची सनद मिळविली होती.
आरोपी लोकेश भास्कर याने हल्ल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून दोघांनाही मेयो रुग्णालयात दाखल केले आहे.