शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली महिलांशी मैत्री अन् बक्कळ पैशाचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:29 PM

फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली विविध वयोगटातील महिलांशी मैत्री अन् बक्कळ पैशाचा रोजगार देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीने तिच्या साथीदारासोबत संगनमत करून मोहन महादेवराव मोहरपुरे (वय २९) यांना सव्वालाखाचा गंडा घातला.

ठळक मुद्देघातला सव्वालाखाचा गंडा : फसवणुकीचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली विविध वयोगटातील महिलांशी मैत्री अन् बक्कळ पैशाचा रोजगार देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीने तिच्या साथीदारासोबत संगनमत करून मोहन महादेवराव मोहरपुरे (वय २९) यांना सव्वालाखाचा गंडा घातला.मोहरपुरे न्यू बिडीपेठमधील सुभेदार लेआऊटमध्ये राहतात. १५ जूनला त्यांनी फ्रेण्डशिप क्लबची जाहिरात बघून ७४२०९१५६३० वर संपर्क केला. पलीकडून बोलणाऱ्या दिव्या पाटील नामक तरुणीने मोहरपुरे यांना निशा फ्रेण्डशिप क्लबची मेंबरशिप घेण्यासाठी एक हजार रुपये रजिस्ट्रेशन फी एसबीआयच्या ३६५४१६४६९९५ खात्यात जमा करायला सांगितले. मोहरपुरेने ही रक्कम भीम अ‍ॅपवरून भरल्यानंतर तिने आमच्या रामदासपेठेतील कार्यालयात कारकुनाची नोकरी मिळेल, २५ हजार रुपये महिना मिळेल, असे सांगितले. त्यानंतर अधिक माहितीसाठी क्लबचा कथित व्यवस्थापक रितेश याच्या मोबाईल क्रमांक ९१३७६६९६९७ वर संपर्क करण्यास सांगितला. रितेशशी बोलणे केल्यानंतर त्याने मोहरपुरेला भलताच रोजगार सांगितला. नवनवीन महिला मुलींशी मैत्री अन् त्यातून बक्कळ पैसा कमविता येईल, असे सांगून १५ जून ते ९ जुलैपर्यंत १ लाख, २१ हजार, ८०० रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतरही आरोपी मोहरपुरेंना वेगवेगळे कारण सांगून १२ जुलैपर्यंत पैशाची मागणी करीत राहिले. त्यांची बनवाबनवी लक्षात आल्याने मोहरपुरेने आपली रक्कम परत मागितली असता आरोपींनी त्याच्याशी संपर्क तोडला. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने मोहरपुरेंनी सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.अनेक दिवसांपासून गोरखधंदाफ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली देशातील कोणत्याही शहरात महिला-मुलींशी थेट संपर्क आणि मैत्री करून देण्याच्या नावाखाली आणि त्यातून मोठी रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याच्या तक्रारीही झाल्या आहेत. मात्र, पोलिसांना या रॅकेटला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाते.

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी