शासकीय नोकरीच्या नावावर १७ लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:33+5:302021-02-05T04:55:33+5:30
नागपूर : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १७लाखाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनोद बळीराम ...

शासकीय नोकरीच्या नावावर १७ लाखाची फसवणूक
नागपूर : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १७लाखाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनोद बळीराम गजभिये (४७) रा. इंदोरा, गौरवराजे ज्ञानेश्वर साावरकर (४०) आणि फिरोज अब्दुल मलानी (२५) रा. यवतमाळ अशी आरोपीची नावे आहे.
आरोपींनी २०१७ मध्ये मनीष नगरात सांस्कृतिक विकास मंडळाचे कार्यालय सुरू केले. त्यांनी लोकांना हे शासकीय कार्यालय असल्याचे सांगितले. वरुड, अमरावती येथील रहिवासी राहुल गायकीसह तीन लाोकांना चपराशी म्हणून नियुक्त केले. शासकीय नोकरी असल्याचे सांगत तिघांकडून १७ लाख रुपये घेतले. काही महिन्यापर्यंत तिघांना वेतनही दिले. नंतर कार्यालय बंद केले. रााहुल व त्याचे मित्र आपले पैसे परत मागू लागले. आरोपी सातत्याने टाळाटाळ करीत असल्याने राहुलने बेलतरोडी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
------------------- ६.१५ लाखाची डायमंड रिंग चाोरीला
नागपूर : प्रतापनगर येथील एका शासकीय कंत्राटदाराच्या घरून ६.१५ लाख रुपये किमतीची डायमंड रिंग चोरीला गेली. गायत्रीनगर येथील राहुल तारेकर हे शासकीय कंत्राटदार आहेत. ३० जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीने चेंजिंग रुमच्या ड्राॅवरमध्ये डायमंड रिंग ठेवली होती. सकाळी ११ ते सायंकाळी ६ या दरम्यान कुणीतरी अज्ञात आरोपीने ती चोरून नेली. याची माहिती होताच तारेकरने घरातील नोकरांना विचारपूस केली. परंतु काहीही माहीत झाले नाही. अखेर त्यांनी प्रतापनगर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.