नागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 22:47 IST2020-11-26T22:45:51+5:302020-11-26T22:47:24+5:30
Fraud by cyber criminals, crime news तातडीने आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुमचे बँक अकाऊंट बंद होईल, असा धाक दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका व्यक्तीच्या खात्यातून ९९ हजार, ३१२ रुपये काढून घेतले.

नागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तातडीने आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुमचे बँक अकाऊंट बंद होईल, असा धाक दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका व्यक्तीच्या खात्यातून ९९ हजार, ३१२ रुपये काढून घेतले.
प्रशांत शाम गडपायले (वय ५०), असे तक्रारदाराचे नाव आहे. ते चंदननगर मधील विनायक अपार्टमेंटमध्ये राहतात. १६ नोव्हेंबरला दुपारी १२ च्या सुमारास त्यांना फोन आला. आरोपीने बँकेतून बोलत आहो, असे सांगितले. तुमच्या आधार कार्डला अपडेट करायचे आहे, असे सांगून बँक खात्याची माहिती घेतली आणि गडपायले यांच्या खात्यातून ९९,३१२ रुपये काढून घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर गडपायले यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. इमामवाडा पोलिसांनी गुरुवारी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.