शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील जय श्रीराम पतसंस्थेत कोट्यवधीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:07 IST

आर्थिक घोटाळ्यासाठी बदनाम झालेल्या उपराजधानीतील आणखी एका पतसंस्थेद्वारा नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ५० ते ६० लाख रुपयाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. परंतु कोट्यवधी रुपये फसले असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देगुंतवणुकीच्या नावावर फसवणुकीचा आरोप : कोतवाली ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक घोटाळ्यासाठी बदनाम झालेल्या उपराजधानीतील आणखी एका पतसंस्थेद्वारा नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ५० ते ६० लाख रुपयाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. परंतु कोट्यवधी रुपये फसले असल्याची चर्चा आहे.ताजे प्रकरण हे गणेशनगर तुकडोजी चौक येथील जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे आहे. या सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे रा. रमना मारुती आहे तर मॅनेजर सुनीता पाल आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही पतसंस्था कार्यरत आहे. येथे फिक्स डिपॉझिट, डेली कलेक्शनसह ग्राहकांची बचत खातेही आहेत. फिक्स डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांना १२ टक्के तर इतर ग्राहकांना ११ टक्के व्याज दिले जात होते. गुंतवणूकदारांना पतसंस्थेशी जोडण्यासाठी एजंट नियुक्त करण्यात आले होते. त्यांना लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बोनससुद्धा दिला जात होता. पतसंस्थेच्या आकर्षक योजनांमुळे मध्यमवर्गीय आणि सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने या पतसंस्थेशी जुळले.सूत्रानुसार गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पतसंस्थेची स्थिती चांगली नाही. मेहरकुरे यांनी काही दिवसात परिस्थिती सामान्य होईल, असे सांगितल्याने गुंतवणूकदारांनी याला गंभीरतेने घेतले नाही. जानेवारीमध्ये पतसंस्थेची परिस्थिती आणखीनच बिघडली. गुंतवणूकदारांना त्यांनी जमा केलेली रक्कम मिळणे बंद झाले. मेहरकुरे वेगवेगळी कारणे देऊ लागला. गुंतवणूकदार आपल्या पैशांसाठी एजंटांकडे तगादा लावू लागले. दबाब टाकू लागले. तेव्हा थोडे दिवस थांबण्यास सांगण्यात आले. यादरम्यान अचानक पतसंस्थेचे गणेशनगर येथील कार्यालय बंद झाले. यामुळे गुंतवणूकदारंमध्ये खळबळ उडाली. म्हाळगीनगर आणि हुडकेश्वर येथील कार्यालयसुद्धा बंद करण्यात आले. तेव्हा पतसंस्थेत मोठी गडबड झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. ते मेहरकुरे आणि पाल यांच्याकडे चकरा मारू लागले. सुनीता यांनी आपण आजारी असल्याचे सांगत पतसंस्थेच्या कामकाजाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले तर मेहरकुरे हे बोलण्याचे टाळू लागले. दोन महिने चकरा लावल्यानंतर अखेरगुंतवणूकदारांनी मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनीही त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. तपासानंतर कारवाई करण्याचे सांगण्यात आले. तेव्हा गुंतवणूकदार संतापले. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच विरोध दर्शविला.यानंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली.त्यांनी मेहरकुरे आणि पंतसंस्थेच्या एजंटला बोलावले. मेहरकुरे पोलिसांच्या हाती लागला नाही तर एजंटने पतसंस्था बंद असल्याने पैसे वितरित करण्यात आले नसल्याचे सांगितले. कोतवालीचे ठाणेदार ज्ञानेश्वर भोसले यांनी लोकमतला सांगितले, १२ ते १५ लोकांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची ५० ते ६० लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली आहे. तपासात इतर पीडितही समोर आल्यास ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.७० गुंतवणूकदार आले समोरसूत्रानुसार मंगळवारी एजंटसह ७० गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शविली. शासकीयस्तरावर फसवणुकीची रक्कम कोट्यवधी आहे. इतर शहरातील लोकांनीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ते अजूनपर्यंत समोर आलेले नाहीत. कोतवाली पोलीस या प्रकरणाला फारसे गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. मेहरकुरे आणि त्याच्या साथीदाराची शिक्षा एजंटला मिळत आहे. गुंतवणूकदार त्यांना त्रास देत आहेत.आर्थिक शाखेचाही परिणाम नाहीशहरात पतसंस्थेद्वारा फसवणूक करण्यात आल्याच्या घटना नेहमीच होत असतात. यावर देखरेख ठेवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा गठित करण्यात आली आहे. त्यानंतरही असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे आर्थिक शाखेचा पाहिजे तसा प्रभाव पडत नसल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक