सराफा व्यापाऱ्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 10:34 PM2021-06-18T22:34:43+5:302021-06-18T22:37:28+5:30

Fraud case सूवर्ण लक्ष्मी योजना आणि सूवर्ण सार्थक योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडून अनेकांची एका सराफाने अनेकांची रोकड हडपली.

Fraud case against Sarafa trader | सराफा व्यापाऱ्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

सराफा व्यापाऱ्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

Next
ठळक मुद्देअनेकांची रक्कम हडपली - दुकानाला टाळे लावून सराफा गायब

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सूवर्ण लक्ष्मी योजना आणि सूवर्ण सार्थक योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडून अनेकांची एका सराफाने अनेकांची रोकड हडपली. जितेंद्र तिवारी असे आरोपी सराफाचे नाव असून त्याचे ईतवारीच्या सराफा बाजारात सूवर्णमोती जेम्स अन्ड ज्वेलर्स नावाने दुकान होते. वर्षभरापूर्वी दुकानाला टाळे लावून तो गायब झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.

२ जानेवारी २०१९ ला तिवारीने सुवर्ण लक्ष्मी योजना आणि सुवर्ण सार्थक योजना सुरू करून गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले. वर्षभर या योजनांत अनेकांनी हजारोंची रक्कम गुंतवली. १२ जानेवारी २०२० ला योजनेचा अवधी पूर्ण झाल्यामुळे गुंतवणूकदार दासारामलखराम पंचभूते (वय ७२), स्नेहल कापसे त्याच्याकडे गेले. तेव्हा त्याने रक्कम परत करण्यासाठी वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळले. मार्च २०२० मध्ये त्याने दुकानाला टाळे लावले अन् बेपत्ता झाला. फोनवर तो गुंतवणूकदारांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याची बनवाबनवी उघड झाल्याने पंचभूते तसेच कापसे यांनी तहसील ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी सराफा जितेंद्र तिवारी याचा पोलीस शोध घेत आहेत.

अनेकांना गंडा, तक्रारदार वाढणार

तिवारीने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तक्रारदार पोलिसांकडे पोहचतील, असा अंदाज आहे.

Web Title: Fraud case against Sarafa trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app