ख्रिश्चन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून १८.५० लाखांची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 20:07 IST2019-10-05T20:05:51+5:302019-10-05T20:07:10+5:30
एका ख्रिश्चन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून १८,५०,००० रुपयांची अफरातफर केल्याची नोंद सदर पोलिसांनी केली आहे.

ख्रिश्चन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून १८.५० लाखांची अफरातफर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका ख्रिश्चन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून १८,५०,००० रुपयांची अफरातफर केल्याची नोंद सदर पोलिसांनी केली आहे. यासंदर्भात सदर पोलिसांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कलम ४०९,३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. या संस्थेवर रघुदास दुपारे, पी. के. निरंजने, परमज्योती, एल.एस. सुखारे, कांबळे, निरंजना प्रसाद, प्रेमचंद चंदूसिंग बिशप, सुरेश जेकब हे पदाधिकारी आहेत. यांच्याकडे संस्थेचा हिशेब सांभाळण्याची जबाबदारी आहे. या संस्थेचे जबलपूर येथील एका बँकेत खाते आहे. या खात्यामध्ये १८,५०,००० रुपये जमा करण्यात आले होेते. परंतु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी अनिल भास्कर साठे (७८), रा. कुकडे ले-आऊट यांनी सदर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात चौकशी सुरू आहे.