शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

चौदाव्या वित्त आयोगाचा ग्रा.पं.ला ३७.६३ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 9:46 PM

चौदाव्या वित्त आयोगातून यंदा जिल्ह्याला ३७ कोटी ६३ लक्ष १७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने नुकताच हा निधी ग्राम पंचायतींच्या खात्यावरही वळता करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारावर निधीचे वाटप

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : चौदाव्या वित्त आयोगातून यंदा जिल्ह्याला ३७ कोटी ६३ लक्ष १७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने नुकताच हा निधीग्राम पंचायतींच्या खात्यावरही वळता करण्यात आला आहे. निधीचे वितरण लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारावर झाले आहे. त्यामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जास्त अनुदान मिळणार आहे.वित्त आयोगाच्या निधीवर आता जिल्हा परिषदेचा हस्तक्षेप राहिलेला नाही. हा निधी कसा आणि कुठे खर्च करावा याचे अधिकार आता ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्याऐवजी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. याशिवाय सरपंचाच्या अधिकारातही राज्य सरकारने वाढ केली आहे. जनतेतून थेट सरपंच निवडला जाणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या जनरल बेसिक ग्रँटच्या पहिल्या हप्त्याची रक्कम केंद्र शासनाने दिली आहे. ही रक्कम राज्य शासनाकडून जिल्ह्यांना वर्ग करण्यात आली. ९० टक्के निधीचा विनियोग ग्रामपंचायतींना सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामांसाठी खर्च करावा लागणार आहे. १० टक्के निधीचा वापर प्रशासकीय तांत्रिक बाबींसाठी करायचा आहे. त्यानुसार पहिला हप्ता ३७ कोटी ६३ लाख १७ हजार जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाला प्राप्त झाला होता. त्यानुसार पंचायत विभागाने सदरचा निधी जिल्ह्यातील एकूण ७६९ ग्राम पंचायतींच्या बँक खात्यावर वळताही केला आहे.तालुकानिहाय निधीचे वितरणतालुका              निधीनागपूर             ४,१०,१०,५१२कामठी            २,६०,७८,२१४हिंगणा              ४,३१,७०,२१८कळमेश्वर         २,००,५९,४४७काटोल             २,८८,८४,७७६नरखेड             २,७३,१७,६९१सावनेर             ३,९७,४७,२८५पारशिवनी        २,३४,६५,६०१रामटेक            ३,०४,५१,८०६मौदा                २,८८,९३,३६१उमरेड             २,४३,९७,८११भिवापूर           १,६५,६०,५२६कुही                २,६२,७९,७५२--------------------------------एकूण - ३७,६३,१७,०००

टॅग्स :Governmentसरकारfundsनिधीgram panchayatग्राम पंचायत