चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार
By Admin | Updated: June 11, 2017 17:51 IST2017-06-11T17:51:33+5:302017-06-11T17:51:33+5:30
देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे एका चार वर्षांच्या चिमुरडीवर एका इसमाने बलात्कार केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे एका चार वर्षांच्या चिमुरडीवर एका इसमाने बलात्कार केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास घडली. तिचे आईवडील शेतमजुरीसाठी बाहेर गेल्याचे पाहून तिच्या शेजारी राहणाऱ्या अंकुश शेंडे (२४) या तरुणाने या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवले व आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पिडीत मुलीच्या पोटात रात्री दुखू लागल्याने तिच्या पालकांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीला आला. या घटनेची तक्रार देसाईगंज पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री देण्यात आली असून आरोपी फरार आहे.