शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कंपनीचा फतवा..; आरोग्य विभागातील चार हजार डेटा एन्ट्री ऑपरेटर घरी बसणार

By गणेश हुड | Updated: October 31, 2023 18:22 IST

तीन वर्षांचा करार असताना दोन वर्षातच कार्यमुक्त 

नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य विभागातील मंजूर पदावर बाह्ययंत्रणेव्दारे भरती करण्यात आलेल्या  डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ असताना कंपनी त्यांना दोन वर्षातच त्यांना कार्यमुक्त करणार आहे. यामुळे चार हजार डेटा एन्ट्री ऑपरेटरला घरी जावे लागणार आहे. 

आरोग्य विभागात मे. यशस्वी अकॅडमी फॉर स्कील. पुणे या संस्थेच्या माध्यमातून  दोन वर्षापूर्वी तीन वर्षांच्या चार हजार डेटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली होती.  त्यांना  दरमहा ९ हजार रुपये मानधन दिले जाते. करारानुसार कंपनीने ऑपटरला एक वर्षानंतर १० टक्के तर दोन वर्षानंतर १५ टक्के मानधन वाढ देणे अपेक्षित होते. ऑपटरला वाढ न देता कार्यमुक्त करण्याची नोटीस कंपनीने दिली आहे. यामुळे महाराष्ट्र डेटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या आवाहनानुसार आरोग्य विभागातील कंत्राटी ऑपरेटर संपावर गेले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत १०२ ऑपरेटर संपात सहभागी झाल्याने आरोग्य विभागाचे काम विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे  कोविड काळापासून कार्यरत ऑपरेटरचा कालावधी संपण्यापूर्वीच त्यांना  २० नोव्हेंबर २०२३ पासून कामावरुन कमी करण्यात आल्याबाबत कंपनीने कळविले आहे. दुसरीकडे कंपनीने नवीन डेटा एन्ट्री ऑपरेटरची भरती करण्याबाबतची प्रक्रीया सुरू केली आहे. तीन वर्षानंतर आपल्याला कायम करण्यात येईल. या आशेवर असलेल्या प्रशिक्षीत डेटा एन्ट्री ऑपरेटरांना कंपनीने एका फटक्यात बेरोजगार केले आहे. 

जिल्ह्यातील ऑपरेटर संतप्त; सभापतींना निवेदन

कोविड कालावधीपासून आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या ऑपरेटरांना कंपनीने कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्यावर बेरोजगारीचे संकट आले आहे. ऑपरेटरला न्याय मिळावा, यासाठी  महाराष्ट्र डेटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या नागपूर शाखेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तिरबुडे, उपाध्यक्ष स्वप्नील वानखेडे, सचिव विशाल खंडाते, जितेंद्र मानकर  यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. यावर त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक सुभाष बोरकर यांच्याशी मोबाईलवर चर्चा करून कार्यरत ऑपरटरांना कमी करून बेरोजगार करू नका अशी सूचना केली.  तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्याशी चर्चा करून या संदर्भात आरोग्य अभियानातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून ऑपरेटरांना न्याय मिळावा, अशी सूचना केली. आंदोलकांच्या मागण्या

-कंपनीने आरोग्य अभियानासोबत केलेला करार मोडल्याने कंपनीचा कंत्राट रद्द करावा.-ऑपरेटरांना पहिल्या वर्षातील १० टक्के व दुसऱ्या वर्षातील १५ टक्के मानधन वाढ द्यावी.- कार्यरत ऑपरेटरांना कामावरून कमी न करता कालावधी संपेपर्यंत ठेवावे, त्यानंतर कायम करावे.  -शासनाने मे. यशस्वी अकॅडमी फॉर स्कील कंपनीला काळया यादीत टाकावे. -नवीन ऑपरेटरची नियुक्त करण्याचा आदेश रदद् करावा.

टॅग्स :Healthआरोग्यEmployeeकर्मचारीzpजिल्हा परिषद