शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

रेल्वे प्रवाशांचे मोबाईल, पर्स पळविणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:12 IST

रेल्वे प्रवाशांचे मोबाईल, पर्स पळविणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : लोहमार्ग पोलिसांच्या केले स्वाधीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल, पर्स पळविणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.बुधवारी सकाळी ६.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर आरपीएफचे कामसिंह ठाकुर, जाहिद खान यांना १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळली. तिने आपले नाव असलम खान अहमद खान (१९) रा. अमरावती संगितले. त्याच्याजवळ एक मोबाईल, आधारकार्ड आढळले. त्याची चौकशी सुरु असताना मोबाईलवर नीलेश त्रिवेदी रा. बीहर, सरबरिया, पन्ना, मध्यप्रदेश यांचा फोन आला. प्रवासात नागपूर रेल्वेस्थानकावर अज्ञात आरोपीने त्यांचा ११५०० रुपये किमतीचा एम आय कंपनीचा मोबाईल पळविल्याचे सांगितले. दुसºया घटनेत सकाळी १०.३० वाजता उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांना १५०२३ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. त्याने आपले नाव बारबी राजा बी केसवन (३८) रा. रामजीनगर, त्रिचनापल्ली सांगितले. आपल्यासोबत चार साथीदार असून रेल्वेगाड्यात चोºया करीत असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याजवळ २१५०० रुपयांचा मुद्देमाल असलेली लेडीज पर्स आढळली. दुपारी ४ वाजता हेमंत शरद गुई हे आरपीएफ ठाण्यात आले. त्यांनी संत्रा मार्केट भागात तिकीट काढताना त्यांचे २६० रुपये असलेले पाकिट चोरीला गेल्याचे सांगितले. आरपीएफने सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या खिशातील पाकिट काढणाºया आरोपीचा शोध घेतला. आरोपी प्लॅटफार्म क्रमांक ८ वर इटारसी एण्डकडील भागात असल्याचे दिसताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीने आपले नाव मुकद्दर खान लाल खान (२३) रा. सोनटक्के नगर, ख्वाजानगर, अकोला सांगितले. तर चौथ्या घटनेत सायंकाळी ५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ३ वर विदर्भ एक्स्प्रेसमधून प्रवाशाचे पाकिट चोरी करणाºया विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. पाकिटात हजार रुपये आणि लायसन्स होते. चारही गुन्ह्यातील आरोपींना मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.शालिमार एक्स्प्रेसमधून ३० किलो गांजा जप्तदक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी शालिमार एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी करीत असलेल्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३० किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दपु मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी रेल्वेगाडी क्रमांक १८०३० शालिमार एक्स्प्रेसमध्ये दुर्ग-गोंदिया दरम्यान तपास केला. दरम्यान, आरपीएफला दोन विधिसंघर्षग्रस्त बालक दोन बॅगसह संशयास्पद स्थितीत आढळले. आपण राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील बुंदी येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशयाच्या आधारे त्यांच्याजवळील बॅगची तपासणी केली असता, त्यात दोन कथ्थ्या रंगाचे पाकीट आढळले. पाकिटाबाबत विचारणा केली असता, त्यांनी गांजाची तस्करी करीत असल्याची कबुली दिली. गांजाचे वजन केले असता ते ३० किलो भरले. त्यानंतर जप्त केलेला गांजा आणि विधिसंघर्षग्रस्त बालकांना गोंदिया लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. ही कारवाई दपु मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक उपनिरीक्षक एस. एस. बघेल, सहायक उपनिरीक्षक एस. के. साहू, हेड कॉन्स्टेबल आर. सी. कटरे, पी. रायसेडाम, ईशांत दीक्षित, आर. सी. धुर्वे, एस. बी. मेश्राम यांनी पार पाडली.

 

टॅग्स :railwayरेल्वेtheftचोरी