चाेरट्यांनी बॅगेतील राेख पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:33+5:302021-06-02T04:08:33+5:30
कन्हान : पारशिवनीकडे जाणाऱ्या मार्गाबाबत विचारणा करण्यासाठी थांबलेल्या तिघांपैकी एकाने वाटसरूच्या बॅगेतील २० हजार रुपये काढून ते चाेरून नेले. ...

चाेरट्यांनी बॅगेतील राेख पळवली
कन्हान : पारशिवनीकडे जाणाऱ्या मार्गाबाबत विचारणा करण्यासाठी थांबलेल्या तिघांपैकी एकाने वाटसरूच्या बॅगेतील २० हजार रुपये काढून ते चाेरून नेले. ही घटना कन्हान (ता.पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघाेली शिवारात साेमवारी (दि. ३१) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
जयंत पाटील (२३, रा.गोंडेगाव कॉलनी, ता.पारशिवनी) हा माेटारसायकलने कन्हानहून गाेंडेगावला जात हाेता. दरम्यान, मागून ॲक्टिव्हाने आलेल्या तिघांनी त्याला वाघाेली (ता.पारशिवनी) शिवारात थांबविले. त्यातील एकाने त्याला पारशिवनी शहराकडे जाणाऱ्या राेडबाबत विचारणा केली, तर अन्य दाेघांपैकी जयंतच्या माेटारसायकलला लटकलेल्या बॅगमधील रक्कम अलगद काढली. त्यानंतर, तिघेही निघून गेले. काही वेळाने त्या तिघांना बॅगेतील रक्कम लंपास केल्याचे जयंतच्या लक्षात आले. बॅगेतील २० हजार रुपये त्यांनी चाेरून नेल्याची, तसेच तिघेही २५ ते ५० वर्षे वयाेगटांतील असल्याची माहिती जयंतने पाेलिसांनी दिली. या प्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.