चाेरट्याने घरासमाेरून दुचाकी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:12 IST2021-09-04T04:12:14+5:302021-09-04T04:12:14+5:30

केळवद : घरासमाेर उभी असलेली माेटरसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटरसायकलची किंमत २५ हजार रुपये आहे. ही घटना केळवद ...

The four snatched the bike from the house | चाेरट्याने घरासमाेरून दुचाकी पळविली

चाेरट्याने घरासमाेरून दुचाकी पळविली

केळवद : घरासमाेर उभी असलेली माेटरसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटरसायकलची किंमत २५ हजार रुपये आहे. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी येथे नुकतीच घडली.

सुनील शेषराव बाेबडे (४२, रा. उमरी, ता. सावनेर) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/एई-०९१२ क्रमांकाची माेटरसायकल नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमाेर उभी ठेवली हाेती. मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या परिसरात कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने ती चाेरून नेली. सुनील बाेबडे यांना सकाळी माेटरसायकल न दिसल्याने परिसरात शाेध घेतला. ती कुठेही आढळून न असल्याने त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या माेटरसायकलची किंमत २५ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार रामराव पवार करीत आहेत.

Web Title: The four snatched the bike from the house