लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार महिन्यांपूर्वी सहा वर्षीय मुलीने गिळलेली पीन बाहेर काढण्यासाठी गरीब आई-वडिलांनी चार-पाच डॉक्टरांना दाखविले. पैसा गेला, परंतु पीन पोटातच होती. असह्य वेदनेने मुलगी तडफडत होती. अखेर तिला मंगळवारी नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागात दाखल केले. चार महिने पोटात पीन असल्याने आतड्यामध्ये रुतून बसली होती. विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी जोखीम पत्करली. पोटातून पीन बाहेर काढण्यात त्यांना यश आले. विनाशस्त्रक्रिया व सुस्थितीत पीन काढल्याने आई-वडिलांच्या चेहऱ्यावर डॉक्टरांप्रति समाधान होते.पायल संजय धारण (६) रा. खुटवंडा तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर असे त्या रुग्णाचे नाव.
चार महिन्यांपूर्वी गिळलेली पीन काढली बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:35 IST
चार महिन्यांपूर्वी सहा वर्षीय मुलीने गिळलेली पीन बाहेर काढण्यासाठी गरीब आई-वडिलांनी चार-पाच डॉक्टरांना दाखविले. पैसा गेला, परंतु पीन पोटातच होती. असह्य वेदनेने मुलगी तडफडत होती. अखेर तिला मंगळवारी नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागात दाखल केले. चार महिने पोटात पीन असल्याने आतड्यामध्ये रुतून बसली होती. विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी जोखीम पत्करली. पोटातून पीन बाहेर काढण्यात त्यांना यश आले. विनाशस्त्रक्रिया व सुस्थितीत पीन काढल्याने आई-वडिलांच्या चेहऱ्यावर डॉक्टरांप्रति समाधान होते.
चार महिन्यांपूर्वी गिळलेली पीन काढली बाहेर
ठळक मुद्दे‘सुपर’मध्ये झाली यशस्वी शस्त्रक्रिया : गरीब आई-वडिलांनी मानले डॉक्टरांचे आभार