चाेरट्याने शेतीपयाेगी साहित्य पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:29+5:302021-04-18T04:08:29+5:30
कन्हान : चाेरट्याने शेतातील विहिरीत असलेला माेटरपंप, पाईप व इतर साहित्य चाेरून नेले. त्या साहित्याची एकूण किंमत ७० हजार ...

चाेरट्याने शेतीपयाेगी साहित्य पळविले
कन्हान : चाेरट्याने शेतातील विहिरीत असलेला माेटरपंप, पाईप व इतर साहित्य चाेरून नेले. त्या साहित्याची एकूण किंमत ७० हजार रुपये आहे. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वराडा शिवारात घडली असून, गुरुवारी (दि. १५) दुपारी उघडकीस आली.
प्रज्वल कुमार हेटे (२३, रा. वराडा, ता. पारशिवनी) याची वराडा शिवारात शेती आहे. ताे गुरुवारी शेतात गेला असता त्याला शेतातील शेतीपयाेगी साहित्य चाेरीला गेल्याचे लक्षात आले. यात चाेरट्याने ३५ हजार रुपये किमतीचा माेटरपंप, २५ हजार रुपयांचा अन्य माेटरपंप व १० हजार किमतीचे केबल, पाईप, दाेन व इतर साहित्य असे एकूण ७० हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केल्याची माहिती त्याने पाेलिसांना दिली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९, ४२७ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.