शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

नागपुरात भीषण अपघातात चार ठार, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 12:39 PM

Nagpur News Accident सोनेगाव-चिंचभुवन उड्डाणपुलावर झालेल्या एका भीषण अपघातात चारजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना येथे घडली आहे.

ठळक मुद्देमिहानमधील चार कर्मचारी ठारधडक देणारा वाहनचालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - भरधाव वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील पाचपैकी चौघांचा करुण अंत झाला. वर्धा मार्गावरील खापरी-मिहान पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये कार चालकासह दोन तरुणींचाही समावेश आहे. ते सर्वच्या सर्व मिहानमधील एक्झावेअर टेक्नॉलॉजि लिमिटेडचे कर्मचारी होते.

गुरुवारी डे-नाईट शिफ्ट आटोपल्यानंतर मध्यरात्री १ वाजता ते आपल्या घराकडे निघाले. मिहानमधील बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांना कंत्राट दिले आहे. अशाच एका वाहनातून (अर्टिका - एमएच ३१ - एटी २५९६) पियुष टेकाडे (वय २५, रा. कोराडी रोड, नागपूर), नेहा गजभिये (वय २५, रा. वंजारी लेआऊट, उप्पलवाडी, कामठी रोड), पायल कोचे (वय २७, रा. महेंद्रनगर, टेका), आशिष सरनायल (वय २७, रा.चक्रधर नगर, बोखारा) हे चार कर्मचारी आपल्या घराकडे निघाले. बालचंद्र उईके (वय ३४, रा. काचोरेनगर, चिंचभवन) हा वाहन चालवित होता. वाहनाची गती जास्त होती. अशाच वेगात समोरून येणाऱ्या एका अवजड वाहनचालकाने अर्टिकाला जोरदार धडक मारली. ही धडक एवढी जबरदस्त होती की बऱ्याच दूरपर्यंत त्याचा आवाज आला. कारच्या समोरचा भाग पुरता चक्काचूर झाला होता. वाहनचालकासह पाचही जण कारमध्येच चेंदामेंदा झाल्यासारखी अडकून पडली.

दरम्यान, कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी वाहनेही तेथे थांबली. माहिती कळताच कंपन्यांचे अधिकारी, सोनेगाव पोलीस तसेच गस्तीवरील पोलिसांचा ताफाही धावला. कसे बसे सर्व जखमींना बाहेर काढून मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी आशिष सरनायक वगळता सर्वांना मृत घोषित केले. सचिन बबन सुटे (वय ३९, रा. शताब्दी चौक) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला.

बळी घेणारा कोण ?

या चाैघांचे बळी कोणत्या वाहनचालकाने घेतले, ते शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रक-टिप्पर चालकाने ही धडक दिल्याची चर्चा होती. मात्र, अद्याप तसे काहीही स्पष्ट झाले नाही. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोणत्या वाहनाने धडक दिली त्याचा आम्ही शोध घेत असल्याचे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी लोकमतला सांगितले.

मिहानमध्ये शोककळा

या अपघातामुळे मिहान परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातापुर्वी हे सर्व कर्मचारी हसत खेळत आपल्या सहकाऱ्यांना निरोप देऊन वाहनात बसले. काही वेळेतच त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याचे वृत्त कंपनीत पसरले अन् अनेकांना जोरदार धक्का बसला.

----

टॅग्स :Accidentअपघात