नागपूर  जिल्ह्यात  दोन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 10:06 PM2021-01-07T22:06:27+5:302021-01-07T22:09:56+5:30

Accidents Four diesनागपूर जिल्ह्यात २४ तासात झालेल्या अपघाताच्या दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये चाैघांचा मृत्यू झाला असून, दाेघे जखमी झाले आहेत.

Four dies in two accidents in Nagpur district | नागपूर  जिल्ह्यात  दोन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू

नागपूर  जिल्ह्यात  दोन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमृतांमध्ये वडील व मुलासह विद्यार्थ्याचा समावेश : धामणा व पारशिवनी येथील घटना

लाेकमत न्यूज नेटवर्क
धामणा/पारशिवनी : नागपूर जिल्ह्यात २४ तासात झालेल्या अपघाताच्या दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये चाैघांचा मृत्यू झाला असून, दाेघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वडील व मुलासह विद्यार्थ्याचा समावेश आहे. जखमींमध्येही महिला (आई) व एक विद्यार्थी आहे. अपघाताची पहिली घटना पारशिवनी शहरात बुधवारी (दि. ६) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. यात भरधाव ट्रॅव्हल्सने माेटरसायकलला मागून धडक दिली. दुसरी घटना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा शिवारात गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली असून, यात सुसाट कार ट्रकच्या मागच्या भागावर आदळली. डाॅ. बाबुराव श्रावण भुरे (६२), गणेश बाबुराव भुरे (२५) दाेघेही रा. पंचवटी आश्रम, दिघाेरी, नागपूर, यश भालेराव (१७) व अनुप अतुल पनवेलकर (१४) दाेघेही रा. पारशिवनी अशी मृतांची तर वंदना बाबुराव भुरे (५०, रा. पंचवटी आश्रम, दिघाेरी, नागपूर) व लकी चव्हाण (१४, रा. पारशिवनी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. भुरे कुटुंबीय एमएच-३१/डीके-४४२६ क्रमांकाच्या कारने काेंढाळी (ता. काटाेल)हून नागपूरला जात हाेते. ते धामणा शिवारात पाेहाेचताच त्यांची कार राेडवर उभ्या असलेल्या डीडी-०३/एम-९१८४ क्रमांकाच्या ट्रकवर मागून धडकली. यात वडील डाॅ. बाबूराव व मुलगा गणेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आई वंदना गंभीर जखमी झाल्या. दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून, वंदना यांना उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
तत्पूर्वी, पारशिवनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात भरधाव ट्रॅव्हल्सने माेटरसायकलला मागून धडक दिल्याने दाेघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यश भालेराव, अनुप पनवेलकर व लकी चव्हाण तिघेही एमएच-४०/बीबी-४१३७ क्रमांकाच्या माेटारसायकलने खापरखेडा (ता. सावनेर) येथून पारशिवनीला येत हाेते. ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात पाेहाेचताच मागून वेगात येणाऱ्या एमएपी-४८/पी-०२९१ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात यश व अनुपचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर लकी गंभीर जखमी झाला. अपघात हाेताच नागरिकांसह पाेलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दाेघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर लकीला उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे लकीवर प्रथमाेपचार करून त्याला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी अनुक्रमे हिंगणा व पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

क्रेनची मदत
धडक एवढी जबर हाेती ती कार थेट ट्रकच्या आत शिरली हाेती. धडक लागताच कारची चारही दारे ‘लाॅक’ झाली हाेती. त्यामुळे आतील जखमींना वेळीच बाहेर पडणे शक्य झाले नाही. यात समाेर बसलेले कारचालक गणेश भुरे व त्यांचे वडील डाॅ. बाबूराव भुरे यांचा मृत्यू झाला. ट्रकमध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी पाेलिसांना ‘क्रेन’ची मदत घ्यावी लागली. या अपघातामृळे महामार्गाच्या एका ‘लेन’वरील वाहतूक ठप्प झाली हाेती. कार बाजूला केल्यानंतर हिंगणा पाेलिसांनी वाहतूक सुरळीत केली. नागरिकांचा राेष लक्षात घेता पारशिवनी पाेलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेली ट्रॅव्हल्स खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा केली हाेती.

Web Title: Four dies in two accidents in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.