बांधकाम साहित्य चाेरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:46+5:302021-04-10T04:08:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : सावनेर-१४ मैल मार्गाच्या चाैपदरीकरणासाठी वापरले जाणारे बांधकाम साहित्य चाेरून नेणाऱ्या तिघांना कळमेश्वर पाेलिसांनी घटनेच्या ...

बांधकाम साहित्य चाेरटे अटकेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : सावनेर-१४ मैल मार्गाच्या चाैपदरीकरणासाठी वापरले जाणारे बांधकाम साहित्य चाेरून नेणाऱ्या तिघांना कळमेश्वर पाेलिसांनी घटनेच्या सहा तासात अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून एकूण ४ लाख ९३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. ९) सकाळी करण्यात आली.
शुभम मनाेहर ठाकरे (२५, रा. धामणा, ता. नागपूर ग्रामीण), धीरज ज्ञानेश्वर माहुरकर (२४) व अभयकुमार सरलीगुलाबचंद गुप्ता, दाेघेही रा. गाेंडखैरी, ता. कळमेश्वर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. नागपूर-अमरावती व नागपूर-भाेपाळ या दाेन राष्ट्रीय महामार्गाला जाेडणाऱ्या सावनेर-१४ मैल या मार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच मार्गावरील सावंगी (ता. कळमेश्वर) शिवारातील खडग नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत असून, त्यासाठी कंत्राटदाराने तिथे काही बांधकाम साहित्य ठेवले आहे. ते राेडलगत पडून हाेते.
दरम्यान, चाेरट्यांनी त्यातील काही साहित्य चारचाकी वाहनात टाकून चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच कळमेश्वर पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आली. पाेलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली. या चाेरीत शुभमचा सहभाग असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याला धामणा येथून ताब्यात घेतले. त्याने त्याच्या अन्य दाेन साथीदारांची नावे सांगताच त्यांनाही गाेंडखैरी येथील ताब्यात घेत तिघांनाही अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचे एमएच-४०/एन-७२५९ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन, ९३ हजार २०० रुपये किमतीच्या सेट्रिंगच्या लाेखंडी प्लेट, लाेखंडी बॅरेकेट व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ९३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक खडसे, सहायक फाैजदार धुर्वे, पाेलीस नायक मुदमाळी, बाेरकर, उईके यांच्या पथकाने केली.