शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चार आरोपींना १० वर्षे कारावास

By admin | Updated: November 10, 2014 00:58 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात ४ आरोपींना १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

हायकोर्ट : वर्धा जिल्ह्यातील हत्याप्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात ४ आरोपींना १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दिलीप सुरेश खराडे (२९), प्रशांत शिवाजी खराडे (२५), शिवाजी रामभाऊ खराडे (५३) व गुलाब गोविंदराव खराडे (६४) अशी आरोपींची नावे असून ते सर्व किन्हाळा (बोथली), ता. आर्वी येथील रहिवासी आहेत. वर्धा सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आजन्म कारावास व प्रत्येकी १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला. आरोपींना कलम ३०२ ऐवजी ३०४-१ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरविले व आजन्म कारावासाची शिक्षा १० वर्षे सश्रम कारावासात परिवर्तित केली. सत्र न्यायालयाचा अन्य आदेश कायम ठेवला.मृताचे नाव बबनराव शिंदे होते. ३१ आॅगस्ट २००८ रोजी आरोपींनी बबनरावची हत्या केली. प्रशांतने तलवारीने वार केला, तर इतरांनी काठ्यांनी मारले. खरांगणा पोलिसांनी घटनेचा तपास केला होता. आरोपींतर्फे अ‍ॅड. एस. व्ही. सिरपूरकर व अ‍ॅड. राजेंद्र डागा, तर शासनातर्फे एपीपी विनोद ठाकरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)