चाकू घेऊन सापडला, पोलिसांनी तुरुंगात टाकला
By दयानंद पाईकराव | Updated: March 3, 2024 19:40 IST2024-03-03T19:40:31+5:302024-03-03T19:40:43+5:30
चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक करून दुचाकीसह ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चाकू घेऊन सापडला, पोलिसांनी तुरुंगात टाकला
नागपूर: चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक करून दुचाकीसह ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोहेल रफिक अंसारी (२२, रा. खरबी रोड, विजय पंडितनगर, नंदनवन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी २ मार्चला दुपारी ३.३० वाजता गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत असताना त्यांना सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिठानिम दरगाह येथील शासकीय शौचालयाच्या बाजुला एक व्यक्ती दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, सी. ई-३७०३ वर दिसला.
पोलिसांना पाहून तो पळून जात होता. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेत २०० रुपये किमतीचा एक लोखंडी चाकु आढळला. पोलिसांनी चाकु आणि दुचाकी असा एकुण ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपी सोहेलविरुद्ध कलम ४, २५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.