माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावास
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: August 6, 2025 14:04 IST2025-08-06T14:03:53+5:302025-08-06T14:04:56+5:30
Nagpur : संतापलेल्या जाधव यांनी पोलिसांसोबत वाद घातला होता. या घटनेनंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Former MLA Harshvardhan Jadhav sentenced to one year in prison
नागपूर: सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर सत्र न्यायालयाने बुधवारी एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
२०२४ मध्ये शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये असताना हर्षवर्धन जाधव त्यांना भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना अडवले. यामुळे संतापलेल्या जाधव यांनी पोलिसांसोबत वाद घातला होता. या घटनेनंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.