माजी क्रिकेटर प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 23:07 IST2020-01-22T23:05:27+5:302020-01-22T23:07:48+5:30
बँकेचे कर्ज थकविल्याने प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. वैद्य हे माजी क्रिकेटर आहेत. यापूर्वी एक प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

माजी क्रिकेटर प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेचे कर्ज थकविल्याने प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. वैद्य हे माजी क्रिकेटर आहेत. यापूर्वी एक प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत वैद्य यांनी कॉसमॉस बँकेकडून ३७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड केली नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी कर्जाची रक्कम परत केली नाही. त्यामुळे बँकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेतल्यावर थकीत रक्कम वसुलीसाठी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बुधवारी रामदासपेठ येथील वैद्य यांचे एक कार्यालय जप्त करण्यात आले. त्यांच्या कार्यालयाची किंमत अडीच ते तीन कोटींच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.